केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंकडून शिवशरण कुटुंबियांचे सांत्वन

पंढरपूर LIVE 15 नोव्हेंबर 2018



 पंढरपूर, दि.15- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माचणूर येथे शिवशरण कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
              श्री. आठवले यांनी आज सकाळी साडे नऊच्या सुमारास माचणूर येथील शिवशरण यांच्या घरी जाऊन मृत प्रतीक शिवशरण यांचे वडील मधुकर शिवशरण यांची भेट घेऊन दिलासा दिला. शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव उपस्थित होते.


राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे : आठवले
पंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता उत्तर भारतीयांची जवळीक साधत आहेत. यापुढेही त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून, उत्तर भारतीयांशी अशीच जवळीक ठेवावी असे मत सामाजिक व न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी  महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपाइं ज्येष्ठ नेते सुनील सर्वगोड, विधीतज्ञ कीर्तीपाल सर्वगोड, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे उपस्थित होते.
पुढे आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील मराठी जनता देखील विविध राज्यात राहते त्यांचे रक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे राज ठाकरे ने देखील महाराष्ट्रात इतर प्रांतातून आलेल्या जनतेच्या इतर भाषिक लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. व त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे. असे आठवले म्हणाले.


















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com