विविध विषयांवर आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

पंढरपूर LIVE 15 नोव्हेंबर 2018

भुवैकुंठ पंढरीतील प्रमुख प्रश्‍नांबाबत सातत्याने आवाज उठविणार्‍या 
आ.डॉ. निलमताई गोर्‍हे यांना सत्कार करताना पंढरीतील पत्रकार बांधव

पंढरपूर येथील भक्तनिवास यासाठी राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांनी मोठया श्रद्धेने दिलेला निधी देण्यात आले होते परंतु हे भक्त निवास अर्धवट बांधकाम असल्याबाबत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. *यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले असून प्रलंबित भक्त निवास बाबत चौकशी आदेशही दिले आहेत.*

आज दि. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेना प्रवक्त्या यांनी महाराष्ट्रातील अत्याचाराच्या घटना आणि अत्याचार पीडित मुलींना मनोधैर्य योजनेतून मदत मिळताना होणाऱ्या अचडणी याबाबत चर्चा केली. लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाणे येथील अपूर्वा यादव केस मध्ये हे प्रकरण जलद गती न्यायालयात घेऊन विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. 

त्याच बरोबर पुणे - औंध येथील दुग्ध व्यावसायिक रोहित जुनावणे यांच्या दि.०१ नोव्हेंबर, २०१८ रोजी झालेल्या हत्येची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एम.पी.डी. ए) कारवाई करण्याची मागणी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली ही मागणी मान्य करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहविभागाला कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
 
त्याचप्रमाणे पुणे येथे मार्केट यार्ड दि.१८ ऑक्टोबर २०१८ रोजी मोबाईल चोरीच्या कथित चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अजित पुजारी या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची संबधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्रांच्या भेटीत विषय घेतला असून पुणे पोलीस आयुक्तांना चौकशी करू  कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत.

















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com