'बहुरुपी पु.ल.'- पंढरपूरकारांसाठी दिवाळीची खास मेजवानी

पंढरपूर LIVE 6 नोव्हेंबर 2018


 पंढरपूर, दि. ७ (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी दिग्ददर्शित पु.ल.देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा रंगमंचीय अविष्कार असणारा 'बहुरुपी पु.ल.' या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल उंबरे यांनी दिलीय. दीपावली व पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 6 वाजता संत तुकाराम भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे







श्रमिक पत्रकार संघाच्या वतिने वर्षभर वेगवेगळे सामाजिक व बौद्धिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आठ नोव्हेंबर पासून चालू होणाऱ्या पु,ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मंदिर समितीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 नाटककार, साहित्यिक, नट, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, शिक्षक, विचारवंत, अनुवादक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम मित्र अशी पुलंची अनेक रुपे आहेत. या सर्वांचं विलोभनीय दर्शन घडविणारा हा सर्वांगसुंदर असा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी दिग्दर्शित हा कार्यक्रम अभिवाचन व अविष्कारातून सादर केला जातो. यावेळी पार्श्वसंगितातून पु.ल.देशपांडे यांनी संगितबद्ध केलेली गाणी ऐकविली जातात. सुमारे दीड तास चालणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे संहिता लेखन सुनिता तारापुरे यांनी केले असून ध्वनिसंयोजन गुरुराज यांचे आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com