स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेची फॅबटेक शुगरवर धडक...थकित रक्कम जमा करण्यासाठी कारखाना स्थळावर ठिय्या आंदोलन

पंढरपूर LIVE 7 नोव्हेंबर 2018


बोराळे (प्रतिनिधी) गेल्या वर्षीचे थकीत बिल त्वरीत जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटना यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन कारखाना स्थळावर करण्यात आले.
 आज आमच्या दारात  दिवाळी साजरी झाली नाही कारण तुम्ही आमचे तीनशे रुपये दिले नाहीत त्यामुळे आम्ही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आंदोलन करुन काळी दिवाळी साजरी करत आहोत असे मत शेतकर्‍यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.  वारंवार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने स्वाभिमानी च्या वतीने आज हे तिव्र आंदोलन करण्यात आले. 






त्यामुळे कारखाना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकर्‍यांनी तब्बल चार तास कारखाना बंद ठेवला.
व जो पर्यंत स्वतः चेअरमन या ठिकाणी उपस्तीत राहून आम्हाला ठोस अश्वासन देत नाही तो पर्यंत कारखाना चालू देणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली या नंतर चेअरमन समाधान आवताडे यांनी स्वतः कारखाना स्थळाकडे धाव घेऊन येत्या पंचवीस तारखेपर्यंत राहिलेले संपूर्ण तीनशे रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन दिले यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन स्थगित केले आले. जर का पंचवीस तारखेपर्यंत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा नाही केली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी च्या वतीने देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, मल्लिकार्जुन भांजे, लक्ष्मण सावंत, आप्पासाहेब पाटील, तात्यासाहेब पवार, शांताप्पा कुंभार, अनिल बिराजदार, प्रकाश देवपूर, टोपन्ना कोरे, किसन राठोड, शंकर संगशेट्टी, संजय होनमाने, संभाजी सुळे, गणेश एनपे, उमेश बंदाई, प्रहार चे तालुकाध्यक्ष राजू स्वामी, अमोगसिद्ध काकणकी, महेश काळे, रामगोंडा व्होनुटगी, कल्लाप्पा कोळी, संतोष काकणकी महेश बिराजदार, बाबा इनामदार,  उत्तम सरडे, नवनाथ शिरसटकर , अमर पाटील, आबा खांडेकर, संतोष बिराजदार, रतन रजपूत, यादी पदाधिकारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com