आमदार भारतनाना भालके यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन... ऐन दिवाळसणात जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या नावाने शेतकर्‍यांचा शिमगा...!

पंढरपूर LIVE 7 नोव्हेंबर 2018




श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.भारतनाना भालके यांच्या घरासमोर सरकोली ता. पंढरपूर येथे आज स्वाभिमानी शेतकररी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. साखर 


कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 9.5 रिकव्हरी बेस प्लस शासनाने वाढविलेले 200 अधिक 1% 289 याप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर विविध साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ऐन दिवाळसणात चटणी-भाकरी खाऊन शेतकरी बांधव साखर कारखानदारांच्या नावाने शिमगा करताना आढळून येत आहेत. एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळायलाच हवी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.


या आंदोलनात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, उपजिल्हाध्यक्ष निवास भोसले,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,  माजी उपसभापती विष्णू बागल,  तालुका अध्यक्ष नवनाथ माने, युवा आघाडी शहर अध्यक्ष अतुल करंडे,  जिल्हा  संघटक  विजय रणदिवे,  मेजर नागटिळक, किर्तीकुमार  गायकवाड, कांताभाऊ नाईकनवरे,  विश्रांतीताई भुसनर,  बाहुबली सावळे,  राजेंद्र सावळे, बापू भोसले,  अतुल फाटे,  संतोष शेंडगे आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com