भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांना तडीपार करा... बहुजन संघटनांची मागणी

पंढरपूर LIVE 15 नोव्हेंबर 2018





 या राज्यातील भाजप सरकार हे जातीयवादी असून सातत्याने जातीयद्वेष निर्माण करण्याचे काम या सरकारमधील भाजपाचे मंत्री व पदाधिकारी करीत आहेत. पंढरपूर येथील भाजपाचे शहराध्यक्ष वादग्रस्त संजय वाईकर यांनी श्री विठ्ठल मंदिरात जावून कर्मचारी व अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व दलित समाजाच्या भावना दुखावतील अशा पध्दतीची शिवीगाळ तेथे उपस्थित असणाऱ्या दलित समाजातील कर्मचाऱ्यांना केली. 

 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असून त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला असल्याने संजय वाईकर यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा सुध्दा गुन्हा दाखल करण्यात यावा.
 सदर प्रकरणात मेहेरबान कोर्टाने दि.22/11/2018 पर्यंत संजय वाईकर यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. परंतू दि.22/11/2018 नंतर यांना अटक करून त्यांची यापूर्वीच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी पडताळून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी. भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून या आधीसुध्दा त्यांच्यावर विनयभंग व अनुसुचित जाती जमाती अत्याचाराची केस दाखल आहे.  संजय वाईकर यांच्या वक्तव्यामुळे पंढरपूर शहरातीलच  नव्हे तर राज्यातील दलित बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे कार्तिकी यात्रेच्या  तोंडावर  कायदा  व  सुव्यवस्थेचा  प्रश्न  निर्माण होवू  शकतो  त्यामुळे दि.22/11/2018 नंतर संजय वाईकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर पुर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी.

 अन्यथा सर्व दलित संघटना, पुरोगामी विचारांच्या संघटना रस्त्यावर उतरतील याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील असे निवेदन सर्व दलित संघटना व पुरोगामी विचाराच्या संघटनाच्या वतीने  प्रांत आधिकारी सचिन ढोले साहेब यांना देण्यात. यावेळी मा. दिलीपरावजी देवकुळे, अरूण भाऊ कोळी, अंबादास वायदंडे, भोला साठे, संतोष सर्वगोड, महेश साठे, स्वागत कदम, किशोर खिलारे, संदिप मुटकुळे,महावीर अंभगराव,उमेश सर्वगोड,  राहुल लोहोकरे, पिंटू रणपिसे, शैलेश आगवणे,कबीर देवकुळे,अनेक सामाजिक संघटना आणि  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते, 

खालील संघटनांनी संयुक्तपणे निवेदन दिले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी
आण्णाभाऊ साठे युवक संघटना
दलित स्वयंसेवक संघ
बहुजन रयत परिषद
शिवबुध्द प्रतिष्ठान
धनगर समाज उन्नती मंडळ
राष्ट्रीय चर्मकार महासंघ
महर्षि वाल्मिकी संघ
दलित महासंघ
संभाजी ब्रिगेड
भारतीय दलित महासंघ
कोळी महासंघ
अ.भा.महात्मा फुले समता परिषद
आरपीआय मातंग आघाडी
प्रबुध्द रिपब्लिकन पक्ष
भारीप बहुजन महासंघ
भारत मुक्ती मोर्चा















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com