रेल्वे विभागातील मागण्या प्राधान्याने सोडवू-खा.विजयसिंह मोहिते-पाटील

पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018



मिरज-सांगोला-मुंबई रेल्वे सुरु करणेसाठी 
कामटे संघटनेची आग्रही मागणी
सांगोला/प्रतिनिधी :
    सांगोला येथील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या विविध समस्या व प्रश्नांसंबंधी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माढा लोकसभेचे खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांची अकलूज येथील "शिवरत्न' बंगल्यावर भेट घेतली. 
    खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांची सोलापूर रेल्वे विभागाच्या प्रमुखपदी निवड झालेबद्दल त्यांचा कामटे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मिरज-सांगोला-मुंबई ही नवीन रेल्वे दररोज सुरु करावी व कोल्हापूर-नागपूर दररोज सोडावी याकरिता आग्रही निवेदन देण्यात आले. त्यांनी त्याचा सकारात्मक विचार करुन रेल्वे मंत्रालयाकडे याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सोलापूर रेल्वे विभागात येणाऱ्या सर्व समस्या व संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन पूर्ण करणार असल्याचे सांगितले. 
    यावेळी त्यांना शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या सोमवार 26 नोव्हेंबर रोजी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला या दिनी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याकरिता 10 वे रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याकरिता खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. अशी माहिती संस्थापक निलकंठ शिंदे-सरकार यांनी दिली. यावेळी अच्युतराव फुले, अध्यक्ष  संदीप   बनकर, ऍड.हर्षवर्धन चव्हाण यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने अकलूज येथे यावेळी उपस्थित होते. 















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com