उपेक्षित समाज घटकातील भगिनींना साडीचोळी भेट देऊन रोटरी क्लब तर्फे अनोखी भाऊबीज

पंढरपूर LIVE 10 नोव्हेंबर 2018


एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना आणि महासत्ता म्हणून पुढे येत असताना आज जागतिक पातळीवर भारताचा दबदबा आहे.  सर्वत्र भारताचा नावलौकिक होत आहे. पण असे असतानाही आपल्या देशातील गरीब आणि श्रीमंतातील दरी वाढतच आहे. ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी ती वाढतच आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दुरावा कमी व्हावा, गरीबांनाही समान वागणूक मिळावी, मानसन्मानाने जगता यावे यासाठी रोटरीही सेवाभावी संस्था जगभरात सामाजिक सद्भावनेच्या दृष्टीकोनातून काम करीत आहे.  या कार्यात यशही मिळाले आहे. यापुढे एक पाऊल टाकत आता वंचित उपेक्षित गरीब महिलांनाही दिपावली साजरी करता यावी यासाठी यावर्षी भाऊबीज साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम रोटरी डिस्ट्रीक्ट राबवला आहे.

समाजाच्या उपेक्षित आणि शेवटचा घटक म्हणून ओळखला जाणाऱ्या गरीब व कष्टकरी महिला भगिनीसाठी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ द्वारे भाऊबीजेला हा उपक्रम राबविला गेला. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ मध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद या मराठवाड्यातील आठ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर  व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण १०० क्लब आणि ४ हजार सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यामध्ये सर्व क्षेत्रातील तज्ञाचा समावेश आहे. विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे व समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सन्माननीय व्यक्तींचा या उपक्रमात सहभाग आहे. रोटरी क्लबांचे समाजकार्य सर्वपरिचित आहे. पोलिओ निर्मुलन, सामाजिक शांतता व सदभावना, शैक्षणिक, कायदा विषयक जाणीवजागृती, किल्लारी भूकंपप्रसंगी बचाव व मदत कार्य व त्यानंतरच्या पुनर्वसन कार्यात रोटरी क्लबने बजावलेली भूमिका आणि उचललेला खारीचा वाटा जागतिक पातळीवर उल्लेखनीय व अनुकरणीय असाच आहे व या कार्याची देशाने दखल घेतलेली आहे.




एकीकडे समाजाच्या हिताचे उपक्रम राबवताना समाजाच्या उपेक्षित व वंचित घटकातील महिलांच्या जीवनात आनंदाचे दीप उजळावेत, यादृष्टीने यंदाच्या दिवाळी सणानिमित्त रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ वतीने पालावर राहणाऱ्या, शेतात राबणाऱ्या, अस्वच्छ व सफाईची कामे करणाऱ्या महिलासाठी एवढेच काय आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्यासाठी  सुद्धा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला गेला आहे. आर्थिक परिस्थितीअभावी  दीपावली साजरी करता येणे शक्य नाही. नवे कपडे घालता येत नाहीत. गोडधोड पदार्थ खाता येत नाहीत अशा उपेक्षित महिलाना ही इतरांप्रमाणेच दिवाळी साजरी करता यावी यासाठी या महिलाना दिवाळी सणानिमित्त भाऊबीजेच्या दिवशी साडीचोळी भेट दिल्यामुळे यंदा अकरा जिल्ह्यातील गोरगरीब, कष्टकरी महिलांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. 'रोटरी'रुपी भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. 



रोटरी क्लब पंढरपूर यांनी आज आपटे उपलप प्रशालेत रोटरी  ३१३२ चे प्रांतपाल श्री. विष्णु मोंढे यांच्या संकल्पनेतून वंचित व उपेक्षित भगिनींसाठी हा उपक्रम राबवीला.या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या दहा व क्लबमधील सदस्यांकडून वीस अश्या एकूण तीस साड्या समाजातील गरीब व उपेक्षित महिलांना देऊन खऱ्या अर्थांनी भाऊबीज साजरी केली.
   





 सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रो. जयंत हरिदास, सचिव रो.किशोर सोमाणी,रो. किशोर निकते, अमित पुरंदरे, सोमेश गानमोटे, लक्ष्मण बागल, अमरीश गोयल, डॉ. दीपक अचलारे, डॉ.सचिन दोशी,डॉ. कैलास करांडे, विश्वास आराध्ये आदी सदस्यांनी होण्यासाठी मदत केली. 
उपक्रम यशस्वी व्हावा आणि वंचित भागिनींच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी आपले मोलाचे योगदान देणाऱ्या रोटरी क्लबचे हे कार्य अनुकरणीय व समाजाला नवी दिशा देणारे ठरावे हिच अपेक्षा...



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com