अंगमेहनती व कष्टकर्‍यांचा आवाज...जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिले निवेदन

पंढरपूर LIVE 10 नोव्हेंबर 2018



। पंढरपूर, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली भाऊबीज या दिवशी राज्यातील प्रत्येक आमदार खासदार यांच्या घरासमोर तुम्हाला पेंन्शन आम्हाला टेंन्शन या आंदोलनाचा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व केेंद्रातून प्रत्येक तालुक्याच्या आमदार खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. हमाल कामगार कष्टकरी वर्गाला व शेतकरी, शेतमजूर यांना 3000 रू. पेंन्शन मिळाली पाहिजे अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण गरजूवंताना मिळाले पाहिजे. व शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महासंघाच्यावतीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस शिवाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, आ. भारत भालके, आ. प्रणिती शिंदे, आ. प्रशांत परिचारक, आ. दत्तात्रय सावंत, आ. नारायण पाटील आदीसह जिल्ह्यातील प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. 


हमाल पंचायत पंढरपूर, हमाल पंचायत करमाळा, हमाल पंचायत बार्शी, हमाल पंचायत कुर्डूवाडी व कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील सर्व हमाल पंचायत संघटना आदीने सोलापूर जिल्ह्यातील आपआपल्या केंद्रावरून आमदार खासदार व मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कष्टकरी हमाल कामगार, तोलार, शेतकरी, शेतमजूरांना किमान 3000 रू. पेंन्शन मिळाली पाहिजे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव जाहिर झाला पाहिजे. सर्वांना आरोग्य, शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे. दुष्काळ निवारण्यासाठी सर्व समावेशक समिती गठीत करावी, माफत दरात घरकूल योजना राबवावी. या मागण्यांचा विचार करण्यात यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आमदार खासदारांना दिलेल्या निवेदनात म्हटंले आहे. 

यावेळी प्रत्येक केंद्रातील पदाधिकारी पंढरपूर शिवाजीराव शिंदे, मारूती बंदपट्टे, आबाजी शिंदे, सुरेश खटके, विष्णू शेंडे, हरिभाऊ कोळी, उत्तरेश्‍वर जाधव, संतोष सावंत, शिराजभाई मुलाणी आदी कामगार तसेच सोलापूर मधून जिल्हाउपाध्यक्ष पांडूरंग साबळे, दत्ता मुरूमकर, सिध्दू हिप्परगी, अंकूश मडखांबे, नागनाथ खरात, राहूल ढेपे, राजू काळजे, गप्पार चांदा, कामगार प्रतिनिधी शिव पूजारी व इतर कामगार, करमाळ्यातून अध्यक्ष अ‍ॅड. राहूल सावंतसह सर्व कामगार, बार्शीतून अध्यक्ष गोरख जगताप सह सर्व कामगार, कुर्डूवाडीतून अध्यक्ष सुरेश बागल, बप्पा चव्हाण, मधूकर बागल, उपासे व लक्ष्मण बागल सह सर्व कामगार यांनी आपआपल्या केंद्रातून आपआपल्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले. 

डॉ. बाबा आढाव यांचे काम संपूर्ण देश पाहत आहे. उपेक्षीत लोकांसाठी बाबांचे काम चांगल्या पध्दतीचे असून आज खर्‍या अर्थाने बाबा आढावांसारखा नेता कष्टकरी कामगार हमाल तोलारांना मिळाल्याने आज ही चळवळ जिवंत आहे. आज तुम्ही दिलेले निवेदन यावर येणार्‍या आधिवेषनामध्ये आवाज उठवून सर्व साठ वर्षा पूढील वयोवृध्दांना व कामगारांना पेंन्शन मिळाली पाहिजे. सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी नक्की आवाज उठवेन.
- आ. भारत भालके 


ज्या पध्दतीने मी शिक्षक आमदार झालो आज 70 हजार शिक्षकांना पेंन्शन पासून वंचित रहावे लागत आहे. त्याच पध्दतीने आज महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी हमाल तोलार यांना पेंन्शन मिळाली पाहिजे. यासाठी येणार्‍या अधिवेषनामध्ये तारांकीत प्रश्‍न करून सरकारांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.
- आ. दत्तात्रय सावंत


आपल्या निवेदनाचा शंभरटक्के विचार केला जाईल. हे वैयक्तिक काम नसून हे हमाल शेतकरी मजूर या सर्वांचाच प्रश्‍न आहे. यासाठी विधानपरिषदेमध्ये नक्कीच आवाज उठवणार.
- आ. प्रशांत परिचारक




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com