स्वच्छतेसाठी नगरपालीकेस मंदिर समिती सहकार्य करणार - प्रांतधिकारी सचिन ढोले

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018



           पंढरपूर, दि. 29 :- स्वच्छता आरोग्याशी निगडीत महत्वाचा विषय असल्याने कार्तिक वारी कालावधीत स्वच्छतेसाठी मंदिर समिती नगरपालिकेस सहकार्य करेल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी कार्तिकवारी आढावा बैठकीत दिली.
            कार्तिकी यात्रा 11 ते 23 नोव्हेंबर 2018 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्तिकवारी नियोजनाबाबत येथील प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीस गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, शहर पोलीस निरिक्षक राजेश गवळी, नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे,नगरपालीकेचे सुनिल वाळुंजकर यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


           


 श्री. ढोले म्हणाले, यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची रोगराई उद्भवणार नाही. यामुळे स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने काटेकोर नियोजन करावे. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचा-याच्या मदतीसाठी यावर्षी मंदिर समिती मार्फत 150 कर्मचारी उपलब्ध करुन दिले जातील. शहर स्वच्छतेबरोबरच दर्शन रांगेची स्वच्छता करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सुचना त्यांनी नगरपालिकेस केल्या. तसेच शहरातील अतंर्गत रस्ते व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती तातडीने करुन घ्यावी.






भाविकांसाठी  65 एकर येथे पिण्याच्या पाणीशौचालयविद्युत पुरवठा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबधित विभागाने योग्य नियोजन करावे. आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन  ठेवण्याबरोबरच तज्ञ डॉक्टरांचे पथक व सुसज्य रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात.
यात्रा कालावधीत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शहरातील अतिक्रमणे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास प्राधान्य द्यावेस्वच्छ व शुध्द  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शौचालय, वाहतूक नियोजन करावे. दर्शन बारीत पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवावा. वीज वितरण विभागाने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा करावा.
बैठकीत  सार्वजनिक बांधकाम,  तहसिल, पंचायत समिती, पशुसंवर्धन,  एस.टी. महामंडळ या  विभागाचाही बैठीकीत  आढावा घेऊन संबंधिताना  आवश्यक सूचना  प्रांताधिकारी ढोले यांनी या वेळी दिल्या.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com