पंढपूरात बुधवारी 'रन फॉर युनिटी' स्पर्धा स्पर्धेत सहभागी होण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018

                  

           पंढरपूर, दि. 29 :-  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवार दिनांक 31 नोव्हेंबर 2018 रोजी  सकाळी 6.00 वाजता 'रन फॉर युनिटी' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती शहर पोलीस  निरिक्षक राजेश गवळी यांनी दिली.
          ही स्पर्धा  शहर पोलीस स्टेशन येथून सुरु होऊन इंदीरा गांधी चौक-अर्बन बँक, भादुले चौक- नाथ चौक-तांबडा मारुती चौक –कालिका देवी चौक-काळा मारुती चौक-शिवाजी चौक-सावरकर चौक मार्गे शहर पोलीस स्टेशन पर्यंत येणार आहे. या स्पर्धेसाठी शाळा, महाविद्यालय,सामाजिक संस्था, इंडीयन मेडीकल असोशिएसन, केमिस्ट ॲन्ड ड्रग असोशिएसन, पत्रकार यांनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन पोलीस निरिक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.
          जनता व पोलीसांचा संपर्क वाढावा, नागरीकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, पोलीस आणि जनता यांच्यामधील दुरावा कमी व्हावा यासाठी  पोलीस प्रशासनामार्फत विविध सामाजिक उमक्रमाचे यापुढेही आयोजन करण्यात येणार असल्याचेही शहर पोलीस  निरिक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com