पुणे : मेडवर्ल्ड एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशन्सच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त मेअर पुरस्कार वितरण सोहळा

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018

देश महासत्ता होत असताना युवकांना सकारात्मक उर्जेची गरज- एअरमार्शल भूषण गोखले यांचे प्रतिपादन ;   डॉ.न.म.जोशी, चारुहास पंडित, मनिषा बोडस, शर्वरी जमेनिस यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : देश महासत्तेकडे वाटचाल करीत असला, तरीही युवा पिढीसमोर अनेक नकारात्मक गोष्टी ठेवल्या जात आहेत. जर ख-या अर्थाने भारताला महासत्ता करायचे असेल, तर युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची गरज आहे. जेव्हा तरुणाईमध्ये नकारात्मकतेची भावना येईल, तेव्हा समाजातील पाय जमिनीवर ठेऊन काम करणा-या आदर्श लोकांकडे पहावे. देशप्रेम प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते आणि तीच आपली खरी ताकद आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केले. 



मेडवर्ल्ड-एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशनच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त कॅम्पमधील हॉटेल अरोरा टॉवरच्या सभागृहात मेअर पुरस्कार आणि युथ आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, चित्रकार चारुहास पंडित, अभिनेत्री शर्वरी जमेनीस, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू मनिषा बोडस, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मोतिलाल तायडे, पुरस्कार वितरण समितीचे समन्वयक आणि श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलजचे उपअधिष्ठाता डॉ.सचिन वानखेडे आदी उपस्थित होते. 
दंतचिकित्सेतील अहमदाबादचे तज्ज्ञ डॉ.जैमेन पटेल, दंतचिकित्सेचे हरियाणा येथील अभ्यासक डॉ.मनू राठी, पुण्यातील एमडी (मेडिसीन) डॉ.विवेक मनाडे, बंगळुरु येथील डॉ.सुप्रिया मानवी यांना यंदाचा मेअर पुरस्कार 2018 प्रदान करण्यात आला. तसेच अभिनेता अनिल नगरकर, मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर इंडिया पुरस्कार विजेते सुहास खामकर, हिंद केसरी अमोल बराटे, मैत्र-युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संकेत देशपांडे, क्रीडा क्षेत्रातील फिजिओथेरपिस्ट डॉ.सुप्रिया देशमुख यांना युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात देशभरातील 40 हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांना देखील गौरविण्यात आले. 




डॉ.न.म.जोशी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भारतामध्ये मोठया प्रमाणात संशोधन होत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, मेडवर्ल्ड- एशिया इंटरनॅशनल पब्लिकेशन अंतर्गत असलेल्या तज्ज्ञांनी मोठया प्रमाणात संशोधन केले आहे. सामान्य लोकांसाठी काम करण्यासोबतच संशोधन करण्याची वृत्ती डॉक्टरांमध्ये असते, हे कौतुकास्पद आहे. 
शर्वरी जमेनिस म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात काम करताना रियाज व साधना ही अत्यंत महत्त्वाची असते. सराव हा आपल्याला अचूकतेकडे नेतो. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर्स हे दररोज रुग्णांना सेवा देत अशाच प्रकारचा सराव करतात. त्यामुळे आजारांतून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर्स हे त्यांच्यासाठी देव असतात, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला.  
डॉ. मोतीलाल तायडे म्हणाले, देशभरातील डॉक्टरांच्या संशोधन कार्याला प्रोत्साहन देत मदत करण्याकरीता संस्थेची सुरुवात झाली. संस्थेशी संलग्न असे 7 हजारपेक्षा अधिक डॉक्टर्स असून 4 हजारपेक्षा अधिक वैद्यकीय संशोधन पत्रांची निर्मीती, स्वामित्व हक्क आणि जागतिक पातळीवर मान्यता हे संस्थेचे यश आहे. पाच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिके आणि 20 पेक्षा अधिक वैद्यकीय आंतरराष्ट्रीय  नियतकालिकांना असलेले सहकार्य हे गेल्या 10 वर्षात साकार झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. आदित्य थेटे, अरुंधती कानावाला यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सचिन वानखेडे यांनी आभार मानले.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com