श्री संत दामाजी कारखान्याचे ताळेबंदातून ठेवीच्या काही रकमा गायब! :-दामोदर देशमुख

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018   

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा आमच्या मंगळवेढा तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना आहे.

 इतर तीन कारखाने खाजगी साखर कारखाने आहेत.या सहकारी साखर कारखान्यावर सन २०१६ पासून नवीन संचालक मंडळ निवडून आले आहे. त्यांनी ठेवीमधील काही रकमा ताळेबंद पत्रकातून काढून टाकल्या असल्याचा आरोप बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख यांनी केला आहे.






देशमुख म्हणाले की,त्यामध्ये इमारत ठेव १ कोटी ४ लाख ६५ हजार ४८५ रूपये सन २०१४-१५ ताळेबंद पत्रकात होती ती सन २०१५-१६ च्या पत्रकातून गायब झालेली दिसते आहे.ऐच्छिक ठेव सन २०१४-१५ च्या पत्रकात २ कोटी १४ लाख ३७ हजार ९७४ रूपये होती.ती कमी करून सध्या १ कोटी ३८ लाख ३१ हजार ०४९ रूपये अशी  शिल्लक राहिली आहे.सन २०१६-१७ सालची इन्सेटीव्ह रक्कम ९९ हजार १५९ रूपये सन २०१८ सालच्या ताळेबंदातून काढून टाकलेली आहे.
   
एकूण पूर्वीचे ठेवीची रक्कम ६ कोटी २० लाख ४४ हजार ५३६ रूपये इतकी होती ती कमी करून ४ कोटी ३८ लाख ७२ हजार ९६७ रूपये एवढी दाखविण्यात आली आहे.म्हणजे १ कोटी ८१ लाख ७१ हजार ५६९ रूपये कुठे गायब झाले आहेत हे मात्र कळत नाही.
   
याशिवाय ३० व्या वार्शिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये २२५०/- रूपये प्रमाणे ऊस दर सर्वांना अदा केला आहे असे लिहले आहे.पण प्रत्यक्षात काही ऊस उत्पादकांना प्रति मे.टन रू १८८५/- प्रमाणे दर मिळालेला आहे.अषा प्रकारे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केलेला दिसून येतो.पैसे न देता खते घेण्याची सूचना शेतकऱ्यांना करण्यात येते आहे तेही ठराविक दुकानातूनच खत घ्या असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पैशावर स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा नवा पायंडा हे संचालक मंडळ पाडताना दिसते आहे.ऊस उत्पादक शेतकरी सभासदामध्ये यामुळे नाराजीची भावना वाढीस लागताना दिसते आहे.

शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेल्या ठेवीवर नियमानुसार द.सा.द.शे. १२% व्याज देण्यात यावे असे उपविधीत आहे.पण आतापर्यंत दामाजी कारखान्याने एक पैसाही व्याज दिलेले नाही आणि ठेवीच्या पावत्याही दिलेल्या नाहीत.तरी व्याजासह ठेव परत मिळावी अशी मागणी दामोदर देशमुख यांनी केली आहे.





  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com