‘ती आली, तिनं पाहिलं अन् तिने जिंकले’

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018




सिने अभिनेत्री केतकी माटेगांवकर हिची पंढरीत दमदार एंट्री; तरूणाईमध्ये जल्लोष; संकल्प युवा प्रतिष्ठानचा उपक्रम




। पंढरपूर, प्रतिनिधी
संकल्प युवा  प्रतिष्ठानच्या वतीने गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने पंढरीत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्यापैकी हा दहीहंडी सोहळा मोठ्या संख्येने आणि उत्सहाने संपन्न झाला. सिने अभिनेत्री केतकी माटेगांवकर हिच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा संपन्न झाला. 






मला वेड लागले प्रेमाचे या गाण्याने तिने हजारो तरूणाईंचे मन जिंकले. स्टेजवर प्रवेश करताच तरूणाईंनी मोठ्या उत्सहात आणि टाळ्यांच्या कडकडाट तिचे स्वागत केले. स्टेजच्या समोर येऊन तिने सर्व चाहत्यांना नमस्कार करून ‘‘मला वेड लागले प्रेमाचे’’ हे गाणे म्हणत तिने पंढरपूरकरांच्या मनावर छाप पाडली.  युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने केतकी माटेगांवकर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी केतकी माटेगांकर म्हणाल्या की, आज मला प्रथमेश कट्टे यांच्या माध्यमातून पंढरपूरला येण्याचे भाग्य लाभले. माझे पांडुरंगाचे दर्शन झाले. त्यामुळे प्रथमेश कट्टे यांचे तिने आभार मानले.
युवा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी या संकल्पनास पंढरपूर शहराबरोबर ग्रामीण भागातील तरूणाई मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पंढरपूर शहरात प्रथमच हा सर्वात मोठा दहीहंडी सोहळा मोठ्या उत्सहात आणि शांततेत पार पडला. हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी तरूणाईबरोबरच शहरातील पुरूष व महिलांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष प्रथमेश कट्टे, आयोजक गणेश कराळे, गणेश कदम, अभिषेक सावंत, हेमंत मेटकरी, शुभम कोरके, सुहास कदम, ऋषीकेश गावडे, ऋषीकेश हाके आदींनी परिश्रम घेऊन हा सोहळा साजरा केला. 
पंढरपूरातील बाल कलाकार पुष्कर लोणकर, सायली भंडारकवठेकर यांचा सुद्धा या कार्यक्रमात  संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंढरपुरातील अनेक उद्योजकांचा संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर शहरचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, वाहतूक निरीक्षक सारंग चव्हाण, पोलिस निरीक्षक सत्यजित अधटराव, सोलापूर विद्यापीठ सदस्या प्रा. डॉ. फैम्मीदा विजापुरे, अ‍ॅड. संदीप पाटील, प्रसाद सातपुते, गादेगांव ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बागल, पंडीत बागल, दत्ता बागल, सुभाष बागल, उद्योजक गणेश हाके, युवा नेते अनिकेत देशमुख, उद्योजक मोहसिन मुजावर, विनोद सुरवसे, रोहित शिंदे, सचिन धोत्रे, किरण हाके, विजय मेटकरी, मिलिंद येळे, अ‍ॅड. दत्तात्रय पाटील आदींचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कदम यांनी तर आभार गणेश कराळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चंद्रराव, गणेश गोडबोले, नंदकुमार दुपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com