मोदींचा कारभार हुकूमशाही पद्धतीचा:-पृथ्वीराज चव्हाण

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018


मंगळवेढा प्रतिनिधी:- मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावची योजना व भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करून १० कोटी रुपयांचे साखळी बंधारे बांधले, कृषी उत्पादकता घटली असून हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.भाजप सरकारने सामान्य जनतेचे जगणे कठीण केले आहे. नागरिक महागाईच्या वणव्यात होरपळत आहेत. स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांना जसे पिटाळून लावले तसे भाजप सरकारला पिटाळून लावण्याची वेळ आली आहे. या सरकारला सत्तेतून हाकलून लावा', असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 






मंगळवेढा येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते . 

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले,' भाजप सरकारच्या काळात उद्योगात कायम अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्राची अधोगती झाली . मागील चार वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. यामुळे राज्यात सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातला कोणताच घटक या निष्क्रिय सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही.' देशातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य व गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. पंतप्रधान मोदींचा कारभार हुकूमशाही पद्धतीचा आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, आ. भारत भालके यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असून आ. भालकेंच्या सोबत आम्ही आहे. राज्यात धार्मिक दहशतवाद निर्माण करण्याचा डाव असून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी त्यांच्या हातात बंदुका देण्याचे काम हे सरकार करत आहे. डॉ. दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश, कॉ. पानसरे यांचे खरे मारेकरी हे भाजप सरकारच आहे.यावेळी आ.भारत भालके,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आ. रामहरी रूपनवर यांनीही मनोगत व्यक्त केले . 

यावेळी आ.भारत भालके, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील,प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, आ.रामहरी रूपनवर,प्रकाश पाटील आदींजन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे ,भारत मुढे यांनी केले तर आभार काँग्रेस शहराध्यक्ष मारुती वाकडे यांनी मानले.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com