लोटस इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन!

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018


राजस्थानी नृत्य सादर करताना डावीकडून साक्षी पवार, तृप्ती डुबल,समृद्धी लोखंडे,संस्कृती लोखंडे,मनस्वी गायकवाड आणि वैष्णवी श्रीरामे .

पंढरपूर - कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलमध्ये सहोदया कॉम्प्लेक्स सोलापूर च्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व सी.बी.एस.ई. स्कूल साठी विविध स्पर्धांचे आयोजन शनिवार दिनांक २५ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आले होते.  या एकदिवशीय स्पर्धेसाठी एकूण ९ सी.बी.एस.ई. शाळा मधून ५०० विद्यार्थी “फ्लॉवर अरेंजमेट,रांगोळी,लोक नुर्त्य ,समुह गायन,भक्ती गीत गायन, चित्र रेखाटन व  वैयक्तिक गीत गायन” अशा ७ वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी झाले होते.

            या कार्यक्रमाचा आरंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे चित्रकार भारत गदगे यांचे हस्ते करण्यात आले तर दीपप्रज्वलन सहोदया कॉम्प्लेक्सच्या अध्यक्षा सुनिता के,उपअध्यक्षा सुजन थोमास, श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर चे सचिव डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे व लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे नामवंत चित्रकार गदगे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कलेचे महत्व सांगून श्री गणेशाचे सुबक चित्र रेखाटून मार्गदर्शन केले तर संस्थेचे सचिव डॉ. रोंगे यांनी म्हणाले कि, अशा प्रकरच्या स्पर्धांच्या आयोजनामुळे मुलांमधील सुप्त गुण जागे होतात आणि त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो. या स्पर्धेत फ्लॉवर अरेंजमेटसाठी वर्ग ४ ते ६ मधून श्रीशैल्य सोमनाथ माळी (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) हा प्रथम,नयन कदम(सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी) हा द्वितीय तर मयुरेश बागल (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) हा तृतीय आला. तसेच वर्ग ७ ते ९ मधून अजित महादेव जाधव (सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी) हा प्रथम,जान्हवी सोमनाथ माळी (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) ही द्वितीय तर वरून पामे (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) हा तृतीय आला. रांगोळी स्पर्धा वर्ग ४ ते ६ मधून श्रुती बजाज (सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी) ही प्रथम, स्वराली गुळवे (ग्रीन फिंगर स्कूल,अकलूज) ही द्वितीय व अंजली पवार (सिंहगड पब्लिक स्कूल,कमलापूर) ही तृतीय आली. तसेच वर्ग ७ ते ९ मधून रणजीत डांगे (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) हा प्रथम,संपदा उबळे (सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी) हि  द्वितीय तर श्रुती वाघमारे  (ग्रीन फिंगर स्कूल,अकलूज) ही तृतीय आला.लोक नुर्त्य स्पर्धा वर्ग ४ ते ६ मधून सिंहगड पब्लिक स्कूल, केगावच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय पारितोषिक हे एमआयटी स्कूल, केगाव आणि लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव च्या विद्यार्थ्यांना एकत्रित देण्यात आला. तसेच वर्ग ७ ते ९ सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव च्या विद्यार्थ्यांनी प्रथम, सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय पारितोषिक हे ग्रीन फिंगर स्कूल,अकलूज आणि ओरचीड स्कूल, सोलापूर च्या विद्यार्थ्यांना एकत्रित देण्यात आला.समुह गायन स्पर्धा वर्ग ४ ते ६ मधून  सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी च्या विद्यार्थ्यांनी प्रथम, ग्रीन फिंगर स्कूल,अकलूज च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय पारितोषिक हे एमआयटी स्कूल, केगाव च्या विद्यार्थ्यांनी मिळवला. तसेच वर्ग ७ ते ९ सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी च्या विद्यार्थ्यांनी प्रथम, लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय पारितोषिक हे सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव च्या विद्यार्थ्यांनी मिळवला.भक्ती गीत गायन स्पर्धा वर्ग ४ ते ६ मधून सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव च्या विद्यार्थ्यांनी प्रथम, एमआयटी स्कूल, केगाव च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय पारितोषिक हे सिंहगड पब्लिक स्कूल,कोर्टीच्या विद्यार्थ्यांनी मिळवला. तसेच वर्ग ७ ते ९ सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव च्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय पारितोषिक हे एमआयटी स्कूल, केगाव आणि एमआयटी स्कूल, वाखारी च्या विद्यार्थ्यांना एकत्रित देण्यात आले. तर तृतीय पारितोषिक हे सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी च्या विद्यार्थ्यांनी मिळवला.वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत वर्ग ४ ते ६ मधून प्रणव प्रकाश दाळवे-पाटील (सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव) हा प्रथम,अनुष्का श्रीवास्त्तव (सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी) ही द्वितीय तर श्रावणी वाडदेकर (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) ही तृतीय आली. तसेच वर्ग ७ ते ९ मधून  प्राची पाटील (ग्रीन फिंगर स्कूल,अकलूज) ही प्रथम, ऋषिकेश सुरेश शिंदे(सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव) व श्रीकृष्ण दत्तात्रय भोसले (सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव) हा तृतीय आला.चित्र रेखाटन स्पर्धेत वर्ग ४ ते ६ मधून आर्यन घाडगे (सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव) व अथर्व शिंदे (लोटस इंग्लिश स्कूल, कासेगांव) हे दोघे प्रथम,अनुष्का शिंदे  (सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव) ही द्वितीय तर माहेश्वरी मेखले(सिंहगड पब्लिक स्कूल,कमालापूर) ही तृतीय आली. तसेच वर्ग ७ ते ९ मधून  अथर्व लोटके (सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी) हा प्रथम, श्वेता काकडे (एमआयटी स्कूल, बार्शी) ही द्वितीय व ओम शिंदे  (ग्रीन फिंगर स्कूल,अकलूज) हा तृतीय आला.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्मिता नवले,सुधाकर कुंभार, हर्शिनी कौर, प्रकाश नवले, पांडुरंग कोळी,सतीश गेजगे,रामदास रोंगे, देवेन्द्र निंबाळकर,वैभव केंगार, किरण कोडक, सिधार्त सोरत,विक्रांतसिंह चौहान,समीर मुलाणी,सौ.पौर्णिमा मोहिते,अमोल कुंभार, दीपा गुंडेवार,रमेश कताचर्या व ओंकार महाजन यांनी काम पहिले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जानवी दिक्षित व बक्षीस वितरणचे सूत्रसंचालन सौ. आस्मा शैख तर आभार प्रदर्शन  सौ. भाग्यश्री मठपती यांनी केले.









  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com