लोकराज्यमधील माहिती व्यक्तीमत्व विकासास पोषक- प्राचार्य डॉ.सी.बी. कोळेकर यांचे प्रतिपादन
पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर 2018
लोकराज्य वाचक अभियानाचा नातेपुते येथे शुभारंभ
पंढरपूर-दि.01- लोकराज्य मासिकातून मिळणारी माहिती विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला पोषक असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.बी. कोळेकर यांनी केले.
माहिती व जनसपर्क महासंचालनालच्या जिल्हा माहिती कार्यालय सोलापूरच्या वतीने आयोजित लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते येथे करण्यात आला. यावेळी प्राचार्य बोलत होते. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. पी. मोरे, ज्येष्ठ पत्रकार सुनिल राऊत माहिती सहायक एकनाथ पोवार, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य कोळेकर म्हणाले, शासनाच्या योजना घरोघरी पोहोचविण्यात लोकराज्य मासिक उपयुक्त आहे. लोकराज्य मासिकातून मिळणारी माहिती विद्यार्थी, ग्रामीण जनता यांच्यासाठी आवश्यक आहे. लोकराज्य मसिकातून मिळणारी माहिती ही अचुक असल्याने मासिकाने लोकाभिमुखता व विश्वासर्हता संपादन केली आहे. सध्या स्पर्धेचे युग असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक ज्ञानाचा खजिना असून विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिक नियमित वाचावे. शासकीय ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी युवा माहिती दूत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थीनी सहभागी व्हावे आणि योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्राचार्य कोळेकर यांनी केले.
वाचनाचची आवड निर्माण व्हावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेला लोकराज्य वाचक अभियान स्तुत्य उपक्रम असल्याचे मत गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले. लोकराज्य मधील माहिती सर्वांसाठी उपयुक्त असल्याने लोकराज्यचे नियमित वाचक व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, ग्रंथ हे गुरु असून विद्यार्थ्यानी आतापासूनच वैचारिक वाचनाकडे वळावे. अशा वाचनातून प्रगल्भता येण्यास आणि व्यक्तीमत्व विकास होण्यास मदत होते.
वाचनाने विचारांना नवी दिशा मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित वाचान करणे गरजचे आहे. लोकराज्य मासिकातून शासनाच्या योजनांची माहिती देण्याचे काम होत असल्याने याचे नियमित वाचन करावे, असे मत डॉ. मोरे व्यक्त केले. ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या योजनांची आवश्यक माहिती मिळत नाही. या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यानी लोकराज्य मासिक, युवा माहिती दूत अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुनिल राऊत यांनी केले.
प्रारंभी माहिती सहायक एकनाथ पोवार यांनी लोकराज्य वाचक अभियानाची माहिती देऊन लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com