भविष्यकाळात स्वेरी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करेल. -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019


स्वेरीत स्व. मधुकरराव मोरे स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन
पंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘बुद्धीबळ स्पर्धा जिंकणाऱ्याचे अभिनंदन, परंतु पराभूत होतील त्यांचेही अभिनंदन! कारण जिंकण्याचे महत्व पराभूत झालेल्या स्पर्धकाशिवाय अन्य कोणाकडूनही समजणार नाही. परंतु स्पर्धेत मात्र खिलाडुवृत्ती दाखविली पाहिजे. स्पर्धा जिंकल्याचा विजय साजरा कराच पण पराभव देखील पचविता आला पाहिजे. मैदानी खेळ असो अथवा बैठक खेळ असो, खेळ हा चांगलाच आहे. परंतु करिअर करण्यासाठी प्रथम शिक्षणाला प्राधान्य द्या. प्रयत्नाला इच्छाशक्तीची जोड द्या. यासाठी कोणत्याही क्षेत्रात केवळ वेडे न होता ध्येय वेडे व्हा. कारण इच्छाशक्ती प्रचंड असेल तर देवालाही दया येते आणि इच्छिलेल्या क्षेत्रात हमखास यश मिळते. स्वेरीमधील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता भविष्यकाळात स्वेरी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करेल.’ असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
        


सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशन, श्री रामजगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्था व चेस असोशिएशन, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये स्व. मधुकरराव मोरे स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे स्पर्धकांना मार्गदर्शन करत होते. 


प्रारंभी प्रास्तविकात डॉ. विश्वासराव मोरे यांनी आपले वडील स्व. मधुकरराव मोरे यांच्या कार्याचा आढावा सांगून स्पर्धेची का आवश्यकता आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी परीक्षक म्हणून युवराज पोगुल, मिलिंद बडवे यांच्यासह इतर परीक्षक काम पहात आहेत. पाच वर्षे वयोगटापासून ते २१ वर्षे वयोगटातील स्पर्धक संपूर्ण तयारी निशी स्पर्धेत उतरली होती. यामध्ये आजोबांनी नातवाला स्पर्धेसाठी आणले होते असेही दृश्य दिसत होते तर कॉलेज कॅम्पसमध्ये स्पर्धकांना मार्गदर्शक हे मार्गदर्शन करत होते. यामुळे कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर देखील बुद्धीबळाचा पट मांडण्यात आले होते.  यावेळी सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोशिएशनचे सचिव शरद नाईक,अमर मोरे, नानासाहेब देवकाते, पशुवैद्यकीय विभागाचे सहआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे, रवींद्र मोरे बडोदा बँकेचे पी.बी. कोडग, चंद्रकांत निंबाळकर, उत्तम नागणे, मोरे परिवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com