पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019


   पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात ७० वा प्रजासत्तक दिन मोठ्या साजरा करण्यात आला.
  प्रारंभी पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर डाॅ. कैलाश करांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेक्युरेटी कर्मचारी व सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला व मान्यवरांना मानवंदना दिली. सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देश पर गीते गायन करून नृत्य सादर केले यामध्ये विविध गीतांमध्ये विविध पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता देशप्रेम व्यक्त करणारी गीते सादर करून उपस्थितांची स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मने जिंकली तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले.
 




या दरम्यान सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी  सौरभ प्रसन्न मोहोळकर या विद्यार्थ्यांने बॅडमिंटन खेळामध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवले असल्यामुळे इस्टेट मॅनेजर कर्नल धापोला यांच्या हस्ते त्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौरभ मोहोळकर यांचे आई-वडील उपस्थित होते.
   या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, कर्मचा-यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट पंढरपूर मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com