प्रजासत्ताकदिनी डॉ.संतोष मुंडेंनी श्रमांच्या प्रतिष्ठेची पूजा करत भाजीपाला विक्रेत्यांच्या हस्ते केले ध्वजारोहण!
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी यंदाच्या प्रजासत्ताकदिनी श्रमांच्या प्रतिष्ठेची पूजा करत भाजीपाला विक्रेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात तरबेज असलेल्या डॉ. संतोष मुंडेंनी यावर्षी २६ जानेवारीला शहारत वर्षभर ऊन, पाऊस, थंडीची पर्वा न बाळगता रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या मेहनती मान्यवरांच्या श्रमांचे पूजन करत त्यांच्याच हस्ते झेंडावंदन करून एक आदर्श परळी वैजनाथ शहरालाच नाहीतर देशाला घालून दिला आहे.
यावेळी उपस्थितांना डॉ. संतोष मुंडेंनी भारतीय राष्ट्रध्वज, तिरंग्याची रचना इत्यादी गोष्टींची पुढीलप्रमाणे माहिती दिली :-
भारतीय राष्ट्रध्वज
२२ जुलै १९४७ रोजी म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
२२ जुलै १९४७ रोजी म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
*तिरंग्याची रचना*
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत.
ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ / भावना
गडद भगवा - त्याग
पांढरा - शांती
हिरवा - समृद्धी
निळा - चोवीस तास कार्यरत
गडद भगवा - त्याग
पांढरा - शांती
हिरवा - समृद्धी
निळा - चोवीस तास कार्यरत
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीचा बोध होतो.निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.

याप्रसंगी उपस्थितांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना व स्वातंत्र्यसैनिकांना नमन करत शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्र प्रथम या भावनेने कार्यरत राहण्याची शपथ घेत राष्ट्रोन्नतिचा निर्धार केला.
गतवर्षी स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. संतोष मुंडेंनी त्यांच्या श्रीनाथ हॉस्पिटलवर अपंग, विधवा, माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण केले होते. डॉ. संतोष मुंडेंच्या या कार्याचा आदर्श घेऊन इतरांनी वंचित आणि श्रमजीवी वर्गाचा आदर करणे समाजाकडून अपेक्षित आहे. चुकले तर विरोधात लिहिणे हे जसे पत्रकारांचे कर्तव्य आहे तसेच चांगल्या कामाची पोच घेऊन त्याचे कौतुक व्हायलाचं हवे तेव्हा सर्व पत्रकारांतर्फे डॉ. संतोष मुंडेंचे अभिनंदन!
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




