सुनिल वाघमारे यांची वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्षपदी निवड

पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019


पंढरपूर  (प्रतिनिधी):- फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते व प्रबुध्द रिपब्लीकन पार्टीचे माजी राज्य उपाध्यक्षपदी अनवली ता. पंढरपूर येथील सुनिल वाघमारे यांची अ‍ॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचीत बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी सातारा येथील बैठकीत निवड जाहीर केली. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड विजय मोरे , पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य अध्यक्ष शंकर लिंगे, रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष एस के ऐवळे आदि उपस्थित होते. सुनील वाघमारे हे प्रबुध्द रिपब्लीकन पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विरोधात पंढरपूर लोकसभा निवडणुक लढविली आहे. 



‘‘वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवून महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात वंचीत बहुजन आघाडीचे जाळे निर्माण करुन संघटनात्मक कार्य करणार असून पुढील काळात महाराष्ट्रातील सक्षम पर्याय ही वंचित आगाडीच असेल.’’ अशी खात्री देऊन आता बाळासाहेबांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असल्याचे सुनील वाघमारे यांनी सा.जोशाबा टाईम्सशी बोलताना सांगितले.

सातारा विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी उपस्थित असणार्‍या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक झाली.  यावेळी सदरची निवड जाहीर करण्यात आली.  यावेळी पंढरपूर येथील बी आर भोसले,  रिपब्लिक होलार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नाथन केंगार, धैर्यशील भंडारे, सेवागीरी  गोसावी, भारिप चे पंढरपूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कांबळे, पंढरपूर शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, प्रशांत ऐवळे उपस्थित होते.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com