शिवक्रांती युवा संघटनेची राज्यातील विविध जिल्हास्तरीय पदनियुक्ती
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019
पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवक्रांती युवा संघटनेची राज्यातील विविध जिल्हास्तरीय पदाधिकार्यांची निवड प्रकिया आज पुर्ण करण्यात आल्याची माहिती शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
‘‘जो घडवेल तरुणांच्या मनाला, तो घडवेल महाराष्ट्राला’’ हे ब्रीद वाक्य घेऊन एक वेगळ्या दिशेचे सामाजिक कार्य घेऊन समाजकार्यात झेप घेतलेल्या शिवक्रांती युवा संघटनच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहप्रमुख यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथील मातोश्री मीराबाई सेवाश्रम येथे नुकतीच संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी या निवडी करण्यात आल्या. स नुतन पदाधिकार्यांमध्ये अनेक महिला पदाधिकार्यांचाही समावेश आहे. नुतन महिला पदाधिकार्यांच्या निवडी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा अनुराधाताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आल्या.
यावेळी पुढीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या. भिवंडी (मुंबई) तालुकाप्रमुखपदी अक्षय औदुंबर गुंड, ठाणे जिल्हा प्रमुखपदी राकेश मढवी, रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनुु सखाराम गोरविले, रायगड जिल्हाप्रमुखपदी गणेश चित्रे, सोलापूर महिला जिल्हाप्रमुखपदी अश्विनी भापकर, सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी समाधान मारुती चव्हाण, सोलापूर शहराध्यक्षपदी श्रीमंत भापकर, मोहोळ तालुका अध्यक्षपदी सत्यवान रंदवे, पेनुर अध्यक्षपदी अनिल पवार, पेनूर उपाध्यक्षपदी अकिल पवार, पेनुर कार्याध्यक्षपदी नागनाथ फाळके, मोहोळ कार्याध्यक्षपदी समाधान मगर, मोहोळ शहराध्यक्षपदी कैलास चवरे, मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद गुंड,
पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी नवनाथ गोडसे, तुळजापूर शहराध्यक्षपदी प्रशांत थिटे, खंडाळी महिला उपाध्यक्षपदी जमीला लियाकत मुरसल, सारिका सचिन खरात, अकलुज महिला अध्यक्ष माधुरी रविंद्र वाघमारे, अकलुज शहर उपाध्यक्ष रबाना समीर शेख, अकलुज युवक अध्यक्ष दत्तात्रय वसव, पंढरपूर महिला उपाध्यक्ष शकुंतला नारायण शिरसट, मोहोळ युवक शहराध्यक्ष कृष्णा दिनकर सप्ताळ आदींच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरज मोरे, जिल्हा संघटक नागेश नरळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष समाधान देठे, मोहोळ तालुका उपाध्यक्ष गहिनीनाथ भांगे, पंढरपूर शहराध्यक्ष सागर चव्हाण, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख, शहर संघटक विठ्ठल काळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
***
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com