खळबळजनक... सांगोला तालुक्यातील 50 वर्षीय गृहस्थाचे राहत्या घरातून कुटूंबासमक्ष अपहरण...

पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019


सांगोला तालुक्यातील मौजे हलदहीवडी, चव्हाण मळा येथील 50 वर्षी गृहस्थाचे राहत्या घरातून त्याच्या कुटूंबासमक्ष चार चाकी गाडीत घालून अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

याबाबत सांगोला पोलिस स्टेशनकडून समजेलल्या माहितीनुसार दि. 29 जानेवारी 2019 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वरील ठिकाणी वास्तव्यास असणारे यशवंत नामदेव चव्हाण (वय 50) हे आपल्या कुटूंबियांसह झोपलेले असताना त्यांचे घरासमोर एक अनोळखी इसम आला व बुवा... बुवा..! अशी हाक मारु लागला. तेंव्हा घरातील सर्वजण घराबाहेर आले. असताना त्यांचे दारासमोर चार लोक आलेले दिसले. त्यातील लोकांनी चव्हाण यांच्या काखेत हात घालुन त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेंव्हा चव्हाण यांच्या पत्नीने त्यांना अडवले असता त्यांच्या पत्नीला मारहाण करत सदर चार लोकांनी चव्हाण यांना कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन चार चाकी गाडीत घालून त्यांचे अपहरण केले. या घटनेत चव्हाण यांच्या पत्नीच्या दंडाला मुक्का मार लागला आहे.




याबाबत यशवंत चव्हाण यांच्या पत्नी सौ. संगीता यशवंत चव्हाण यांनी आज दि. 30 जानेवारी 2018 रोजी सांगोला पोलिस ठाणेत फिर्याद दिली असून  तानाजी धर्मराज चव्हाण, रा. हलदहीवडी, चव्हाण वस्ती, ता. सांगोला याच्यासह अन्य अज्ञात चार इसमांच्या विरुध्द भादंवि कलम 363, 323, 143, 147 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज हलदहीवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक होणार आहे. अपहरण झालेलेे चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्य असल्याने या निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर त्यांचे अपहरण झाल्याची चर्चा हलदहीवडी परिसरात सुरु असल्याचे समजते.  





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com