वक्ता हा समाज घडविण्याचे काम करत असतो — प्राचार्य डाॅ.अशोक भुईटे
पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019
पंढरपूर—'चांगला वक्ता होण्यासाठी श्रवण, वाचन, निरिक्षणाबरोबरच त्याने समाजाच्या भावभावनांशी समरस होऊन कार्य करायला हवे आहे, यातूनच त्याची संवेदनशीलता जागृत राहते व असा वक्ताच समाज घडविण्याचे काम करु शकतो.' असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोक भुईटे यांनी केले. ते अभिनव अकॅडमीने आयोजित केलेल्या सहाव्या बॅचच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.राणा महाराज वासकर, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक नितीन रत्नपारखी व अकॅडमीचे संचालक मंदार केसकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डाॅ. भुईटे पुढे म्हणाले, आपण लिहिताना चूक केली तर दुरुस्त करु शकतो,परंतु बोलताना केलेली चूक दुरुस्त करु शकत नाही व या चुकीच्या बोलण्यामुळे समाजात आपण वितुष्ट निर्माण करायलाही कारणीभूत ठरतो. वक्त्याला कुठे,कधी,किती व कसे बोलायचे याचे ज्ञान असायला हवे आहे. पंढरपूरसारख्या गावात वक्तृत्वाचे शास्रशुद्ध प्रशिक्षण देणार्या अभिनव अकॅडमीचे काम गरजेचे व कौतुकास्पद आहे.
ह.भ.प.राणा वासकर महाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले, आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये वाणीद्बारे ज्ञानदानाची मोठी परंपरा आहे, सर्वच संतांनी कीर्तन, प्रवचनातूनच समाजाचे प्रबोधन केले आहे. आजही जो चांगले बोलू शकतो, तोच समाजाला खरी दिशा देण्याचे काम करु शकतो. नितीन रत्नपारखी यांनी आपल्या मनोगतातून अकॅडमीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित लेंडवे यांनी स्वागत केले. तुकाराम खंदाडे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तर मयुर पवार यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वल दोशी यांनी केले तर राजश्री लोंढे व चैतन्य कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. मुकुंद कर्वे व अपर्णा आटपाडीकर यांनी प्रशिक्षणार्थींच्या वतीने तर सोमनाथ गायकवाड यांनी अकॅडमीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत अभ्यागत व्याख्याते डाॅ.सचिन लादे व मैत्रेयी केसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. रेणुका देवडीकर यांनी आभार मानले तर मोनिका शहा व प्रशांत ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य मा. कैलाश करांडे सर, द. ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रकाश डबीर सर, मुरलेंद्र शेटे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. हणमंत लोंढे सर, सौ. सुरेखा भालेराव - नागटिळक मॅडम, बावचकर मॅडम, वारकरी पाईक संघाचे भागवत महाराज हंडे,देहूकर महाराज,मानसी केसकर, अंजली लादे, इंद्रायणी मस्के, प्रताप चव्हाण, विनोद भरते, सुनील कोरे, ज्ञानेश्वर मोरे, रामेश्वर कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिनव चे प्रशिक्षणार्थी नगरसेविका अर्चना रानगट, डॉ प्रिया भिंगे, स्मिता गव्हाणे, राजनरेंद्र बडवे,विनोद लटके, अॅड.धनंजय थोरात, रूही तेंडुलकर, रसिका धर्माधिकारी, श्रेयश भोसले, सुयश भोसले, किरण चव्हाण,प्रथमेश उत्पात, प्रशांत मलपे,समृद्धी मोरे, प्रार्थना पाटील, सई खरात यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com