विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे... प्रवेश प्रक्रीया अधिष्ठाता – डॉ. पी.एस.कचरे

पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018





 

तब्बल चौदाशे विद्यार्थ्यांनी ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची 
या शैक्षणिक प्रदर्शनाचा लाभ घेतला
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या विज्ञान व अभियांत्रिकी तंत्रज्ञान विषयीच्या माहितीचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देवून प्रदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम.एम. पाटील, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण कचरे यांच्यासह ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार,प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आगमनामुळे कॉलेज कॅम्पसला जत्रचे स्वरूप आले होते. 
      

 ‘विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी हुशार असूनही, स्पर्धा परीक्षेला पात्र असतानाही केवळ मार्गदर्शनाअभावी परीक्षेचे महत्व ओळखु न शकल्यामुळे ते शासकिय सेवेपासून वंचित राहतात. हाच मुख्य धागा पकडून सायन्स शाखेतील अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपले भवितव्य उज्वल करण्याची संधीकिमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या माध्यमातून स्वेरीने प्राप्त करुन दिली. विषेशतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अभियात्रिकी तंत्रज्ञान विषयाचे ज्ञान फारसे अवगत नसते,यासाठी त्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची माहीती व्हावीतसेच तंत्रविषयांमध्ये आवड निर्माण व्हावी. या दृष्टीने  दि.१४,१५ व १६ सप्टेंबर या तीन दिवशीकिमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचीहे तंत्र  प्रदर्शन खुले करण्यात आले होते. या प्रदर्शनात उडते रोबोट चालविणे कॉम्प्यूटरवर विविध अॅनिमेशन बनविणेछोटे इलेक्ट्रॉनिक सर्किट बनविणे,लेसर प्रिंटर व थ्रीडी प्रिंटींगद्वारे डिझाईन बनविणे इ.प्रात्यक्षिक मुलांना करुन पाहता आले. महाविद्यालयातील संशोधनासंबंधीत प्रयोगशाळाही पहावयास मिळाले. मेकॅनिकल विभागातून रोबो रेस,लेथवार,एरो मॉडेलिंग,कास्ट स्टिल वॉरअॅटो कॅड रेसकटीया रेसटेक्नो मेक वॉरसिव्हिल विभागात फॅब्रिकाब्रीज डिझाईन,कॅड रेससर्वे हंट. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातून सर्कीट सुडोकोप्रात्यक्षीकरोबोट्रीक्स,कॉमन इव्हेंटस्मध्ये ट्रेल ब्लेझरपिकासा, विझो-ओ-टेक,डॉक्युमेंट्री,कॅट-मॅट अॅबिलिटीकॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागातून अॅनिमेशन,एन. एफ. एस.,काऊंटर स्ट्राईककोड डिबगींग आदी विषयक माहिती मिळाली. यावर प्रात्यक्षिकाची माहिती देखील मिळाली. तसेच भविष्यात अभियांत्रिकीत प्रवेश घ्यायचा झाला तर लागणाऱ्या आवश्यक बाबी, त्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधा, वसतिगृह व्यवस्था असे आवश्यक  माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वेरीतील शिस्तबद्ध विद्यार्थी, संशोधनासाठी उपयुक्त वातावरण मिळणारे ज्ञान यामुळे विद्यार्थी प्रचंड उत्साहीत झाले.

      

 सलग तीन दिवस चाललेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या या प्रदर्शनात जवळपास ३२ महाविद्यालयातील जवळपास चौदाशे विद्यार्थ्यांनी व ऐंशी शिक्षकांनी याचा लाभ घेतला. या भव्य व दिव्य प्रदर्शनातील मिळालेल्या माहितीमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी व उज्वल यश मिळणार भविष्य घडविण्याची संधी व योग्य दिशा मिळाली.’असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचीउपक्रमामुळे विद्यार्थी उत्साहीत झाल्याचे दिसून येत होते. हे तीन दिवसीय किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची प्रदर्शन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रम समन्वयक प्रा. धनंजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com