मराठी हायकू दिवस साजरा

पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018

 
पंढरपूर ( प्रतिनिधी):- येथील साहित्य वर्तुळ परिवाराच्या वतीने  शिरीषताई पै यांचा जन्मदिवस 'भारतीय मराठी हायकू दिवस' म्हणून साजरा करण्यात आला.
          याप्रसंगी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव बागल हे अध्यक्षस्थानी होते तर प्रसिद्ध उद्योजक नागनाथराव ताठे-देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
          यावेळी विश्वविक्रमी कवी रवी वसंत सोनार, कवी राजेंद्र झुंबर भोसले, राधेश बादले-पाटील यांनी वैविध्यपूर्ण हायकू सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच कवी सचिन कुलकर्णी व दादासाहेब खरात यांनी काव्यगायन केले. 
           साहित्यिक व साहित्य रसिक यांना शिरीषताई पै यांचे हायकूंबाबत प्रचार आणि प्रसारविषयक कार्य समजावे आणि हायकूंबाबत सर्वांच्या मनात आवड निर्माण व्हावी म्हणून १५ नोव्हेंबर हा शिरीषताई पै यांचा जन्मदिवस 'भारतीय मराठी हायकू  दिवस' म्हणून साहित्य वर्तुळ परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी साजरा केला जातो. 
            या कार्यक्रमास वृत्तपत्रलेखक मल्लाप्पा माशाळे, भाजपाचे सरचिटणीस  सुरेश मोरे,  गणेश महाराज चव्हाण, वासुदेव महाराज शिरकर,  पत्रकार दिनेश खंडेलवाल,  महेश अभंगराव, नागेश पवार , निलांजन बादले पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
          सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन राजेंद्र झुंबर भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन सुजितकुमार कांबळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहित्य वर्तुळ परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com