नरुटे, जानकर वस्ती ला पायाभूत सुविधा देणार – आ. गणपतराव देखमुख

पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018


सांगोला येथील नरुटे, जानकर वस्ती सुधारू – खा. विजयसिंह मोहिते-पाटील

सांगोला शहर व ग्रामीण भागाचा विकास करू – माजी आ. दिपकआबा साळुंखे-पाटील






सांगोला. (प्रतिनिधी) – नरुटे, जानकर वस्ती पूर्ण सुधारू असे आश्वासन खा. विजयसिंहसग मोहिते-पाटील यांनी दिले तर नमूद परिसराला पायाभूत सुविधा देणार असल्याची ग्वाही आ. गणपतराव देखमुख यांनी दिले. मिरा भाईंदर मनपा कर्मचारी सुलेमान मुलाणी यांच्या घराच्या वास्तुशांती तथा गृह प्रवेश या कार्यक्रमास धावती भेट दिली येथील नागरिकांनी निवेदन दिले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खा. मोहिते-पाटील म्हणाले की, सांगोला शहर तथा ग्रामीण परिसरात लोकवस्ती वाढत आहे त्यानुसार नव्याने लोकवस्ती वाढत असलेल्या नरुटे, जानकर वस्ती पूर्णपणे सुधारू आणि नागरिकांना सोयी सुविधा देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आ. देशमुख म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील शेवटचे ठिकाण म्हणून सांगोला तालुका ओळखला जातो. हा तालुका दुष्काळाने त्रासलेला असला तरी नागरिकांना पाणी मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत तसेच सांगोला परिसरात नागरिकांची पसंती वाढत आहे त्यामुळे नवनव्या वस्त्या निर्माण होत आहेत, अशात आमचे कर्तव्य आहे की नागरिकांना पुरेपूर पायाभूत सुविधा द्याव्यात त्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सुविधा नागरिकांना देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिले.

दरम्यान माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांनी स्थानिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यास असल्याचे सांगितले. तसेच सांगोला स्मार्ट सिटी करण्याचा करण्याच्या अनुषंगाने विचाराधीन आहोत असे सांगत शहराचा तथा ग्रामीण भागाचा विकास साठी पुरेपूर प्रयत्न करून नागरिकांना योग्य त्या सोयीसुविधा देऊ असे सांगितले.

मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. तथा महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या घराच्या वास्तुशांती तथा गृह प्रवेश अरमान मंजिल नरुटे, जानकर वस्ती, एच. पी. गावडे पेट्रोलपंप च्या मागे पंढरपूर सांगोला रोड सांगोला येथे कार्यक्रमास धावती भेट दिली दिली असता स्थानिक नागरिकांनी खासदार आणि आमदार यांच्यासमोर आपल्या समस्या सांगून निवेदन दिले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सैनिक उद्धव पाटील, बापूसो भडंगे गुरुजी, लक्ष्मण जाधव, पिरसाहेब मुलाणी, रशीद मुलाणी, भास्कर झाडबुके, मेजर रेवन पाटील, विनोद गडगिरे आदी उपस्थित होते.














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com