सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी २५ नोव्हेंबरला भव्य नोकरी महोत्सव- समाधान आवताडे

पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018



समाधान महादेव आवताडे यांचा पुढाकार
५० कंपनीचे अधिकारी 'सिलेक्शनसाठी येणार

  पंढरपूर: समाधान महादेव आवताडे चेअरमन श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि. मंगळवेढा,चेअरमन आवताडे स्पिनर्स मंगळवेढाचेअरमन आवताडे शुगरमंगळवेढा यांच्या वाढदिवसानिमित्त  श्री. संत तनपुरे महाराज मठस्टेशन रोडपंढरपूर  येथे  दिनांक २५ नोव्हेंबर  २०१८ रोजी सकाळी ८:०० ते ५:०० वाजेपर्यंत भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  


पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना वेळी त्यांनी सुशिक्षित  बेरोजगार तरुणांना रोजगार व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दादांनी दिलेला शब्द व  वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी  बेरोजगार तरुणांना रोजगार तसेच नोकरीची संधी निर्माण करून देण्यासाठी भव्य नोकरी महोत्सव (जॉब फेअर ) चे आयोजन केले आहे. पुण्याच्या'जॉब शोकेस या आयटी व इव्हेन्ट क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेची मदत समाधान (दादा) आवताडे यांनी या कामात घेतली आहे. या संस्थेच्या पुढाकाराने बहुराष्ट्रीय व इतर कंपन्यांचे अधिकारी या मेळाव्यासाठी येणार आहेत. यामध्ये किमान इयत्ता १ पास ते सर्व पदवीधर पदव्युत्तरसर्व आयटीआय ट्रेडसर्व डिप्लोमासर्व डिग्री (० ते १० वर्षेपर्यंत कामाचा अनुभव असलेले सर्व उमेदवारवय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण झालेले असावे) यामध्ये नोकऱ्या उपलब्ध असणारी विविध क्षेत्रे मॅन्युफॅक्चरिंगआयटीबँकिंगहॉस्पिटॅलिटीरिटेल,  फार्मसीबीपीओ,केपीओफायनान्सटेलिकॉमफॅसिलिटीइन्शुरन्सआवताडे स्पिनर्सएस. एम. आवताडे कन्स्ट्रक्शनआवताडे शुगर  व इतर कंपन्याही सहभागी होणार असून यामध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अपंगांनासुद्धा नोकरी देण्याची व्यवस्था या नोकरी महोत्सवात केलेली आहे. यामध्ये एकूण ५० कंपन्या सहभागी होणार आहेत. या भव्य नोकरी महोत्सवात सुमारे ३०००  लोकांना जागेवरच ऑफर लेटर देण्याची व्यवस्था करण्याचा त्यांचा मानस आहे.


ऑफलाईन अर्ज आपण समाधान (दादा) आवताडे जनसंपर्क कार्यालयभक्तिमार्गअश्विनीता गॅस गोडाऊन शेजारीपंढरपूर. व माननीय श्री. समाधान (दादा) आवताडे जनसंपर्क कार्यालय,  खंडोबा गल्लीमंगळवेढा. येथे  आपले अर्ज जमा करण्याची  सोय स.११.०० ते सा. ५.०० या कार्यालयीन वेळेत  उपलब्ध केली आहे. तसेच सर्व अर्जदार आपले अर्ज goo.gl/eBEYXk
या whatsapp link वर नोंदवू शकता. या भव्य नोकरी महोत्सवात आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अल्पोपाहाराची सोय केलेली आहे. या भव्य नोकरी महोत्सव मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन माननीय समाधान (दादा) आवताडे युवामंच पंढरपूर व मंगळवेढा यांच्यातर्फे समाजसेवक संतोष कवडे यांनी या भव्य नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने केले आहे











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com