पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने प्लॅस्टीक बंदी अंतर्गत दोघांवर दंडात्मक कारवाई

पंढरपूर LIVE 1 नोव्हेंबर 2018


महाराष्ट्र शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टीक पासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्याप्लॅस्टीक व थर्माकोल पासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु ताटकप्सप्लेट्सग्लास वाटीचमचेप्लेक्सबॅनर्सतोरणध्वज,प्लास्टीक सीट्स,सर्व प्रकारचे प्लॅस्टीक वेष्टन इच्या उत्पादनवापर,साठवणूकवितरण,विक्री करण्यास राज्यात निर्बंध घालण्यात आलेले आहेतत्यास पंढरपूर नगरपरिषदेने शासन निर्देशानुसार शहरातील सर्व व्यापारांना वृत्तपत्रामध्ये जाहिर प्रसिध्दीकरण देऊन प्लॅस्टीक उत्पादन,साठवणूक विक्री करण्यास बंदी घालती असल्याने कोणीही प्लॅस्टीक वस्तुंचे उत्पादनसाठवणूकविक्री करू नये असे केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल व उत्पादनसाठवणूक व  विक्रीसाठी ठेवण्यात आलेले प्लॅस्टीक यावर कोणतीही पुर्वसुचना न देता जप्त करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाईलअशी सुचना देण्यात आलेली होती.
         


 नगरपरिषदेने असे जाहीर प्रसिध्दीकरण देऊन सुध्दा शहरातील काहीव्यापाऱ्यांनी प्लॅस्टीक वस्तु साठवणूक केलेली असल्याचे निदर्शनासआल्याने मुख्याधिकारी अभिजीत बापट व उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्लॅस्टीक  थर्माकोलअविघटनशील वस्तुंचे (उत्पादनसाठवणूकवाहतूकहाताळणीविक्री)अधिसुचना २०१८ अन्वये पंढरपूर नगरपरिषदेमार्फत दि.२९-१०-२०१८ रोजीदिनेश ट्रेडर्स व यशवंत ट्रेडर्स या दोन आस्थापनाची तपासणी  केली असताएक टन प्रतिबंधीत प्लॅस्टीक  आढळल्याने जप्त करणेत आले  त्यांचेवरप्रत्येकी .रू.५०००/- प्रमाणे .रू१०,०००/- इतका दंड वसुल करणेत आला.अशा प्रकारची कारवाई नगरपरिषद सातत्याने करणार आहेतरी शहरातीलव्यापारीनागरिकांनी प्रतिबंधीत प्लॅस्टीकथर्माकोलचा वापर करू नये.
          सदरची कारवाई पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे आदेशान्वयेआरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विनायक शेटे व त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत कोटगिरीशरद वाघमारे, नागनाथ तोडकर यांनी केली.









महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com