पालवीतील व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केला वाढदिवसाचा खर्च!

पंढरपूर LIVE 1 नोव्हेंबर 2018




चळ्यातील माने गुरुजींचा अनुकरणीय उपक्रम
 पंढरपूर-  एकीकडे लाडक्या कन्येचा पहिला वाढदिवस तर दुसरीकडे अनावश्यक  खर्चाला फाटा  देवून वाढदिवस साजरा कसा करायचा?  या द्विधा मनस्थितीत होते माने गुरुजी! अखेर त्यांनी शाळेतील मुलांना आणि पालवीतील चिमुकल्यांना मुलीच्या वाढदिवसासाठी होणाऱ्या खर्चातून खाऊ, दिवाळी अभ्यासिका, इतर शैक्षणिक साहित्य आणि उपयोगी भेटवस्तू मुलगी मनस्वीच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांना वाटून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून स्वतःचा आनंद द्विगुणीत केला त्यामुळे तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यामधून ‘गुरुजी असावे तर असे.’ असा सूर उमटत आहे. 
          



त्याचे झाले असे ! चळे (ता. पंढरपूर) येथील रहिवासी असलेले पण आंबेमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले संभाजी कुबेर माने यांना गेल्यावर्षी मनस्वी नावाची एक सुस्वरूप कन्या झाली. तिचा परवा पहिला वाढदिवस होता. साजरा तर करावा लागणार, पण वाढदिवसाचा खर्च तर वायाच जाणार ,हा प्रश्न माने गुरुजींच्या मनात उमटला. अखेर गुरुजींना एक सुंदर कल्पना सुचली आणि मनस्वीचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करण्याचे  ठरविले. त्यामुळे गुरुजींनी आंबेमधीलच इयत्ता पहिली ते सातवीमधील जवळपास १९० मुला- मुलींना खाऊ, दिवाळी अभ्यासिका, इतर शैक्षणिक साहित्य आणि उपयोगी भेटवस्तू दिल्या तर दुसरीकडे कोर्टीजवळील पालवीतील ११० मुलांना देखील खाऊ व गरजू साहित्याचे वाटप केले. मनस्वीसह तिची आई सौ मनीषा या देखील या आनंदाच्या  साक्षीदार होत्या. माने गुरुजींनी केलेल्या उपक्रमाचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधींनी माने गुरुजींची प्रत्यक्ष भेट घेतली तेव्हा ते म्हणाले की, ‘मुलीचा वाढदिवस साजरा करताना अधिक जणांना आनद व्हावा या हेतूने मी हा सामाजिक उपक्रम केला. यामुळे अलीकडील काळात वाढदिवस साजरा करताना समाजासाठी काहीतरी करावे ही संकल्पना मनातून आखणाऱ्या पालकांना यातून काहीतरी सामाजिक उपक्रम करण्याची प्रेरणा मिळावी. हाच हेतू यामागे आहे. एकीकडे वाढदिवस साजरा झाला तर दुसरीकडे पालवीतील व प्राथमिक शाळेतील मुला- मुलींच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद पहिला तर हा वाढदिवस निश्चितच स्मरणात राहील. यातून दोन संदेश मला समाजासाठी द्यायचे आहे एक म्हणजे ‘मुलगी बचाव’ आणि दुसरा संदेश म्हणजे ‘ सध्याच्या युगात कोणताही खर्च वायफळ न करता छोट्या-छोट्या गोष्टीतून अधिक आनंद कसा मिळेल ? हे प्रत्येक नागरिकांनी पाहिले पाहिजे.’ खरंच माने गुरुजींचा हा उपक्रम तर प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. गुरुजींना मनस्वीच्या वाढदिवसाला साधारण दहाहजार रुपये खर्च झाला असला तरी यातून त्यांनी दहा कोटींचा परमाआनंद इतरांना दिला. ‘दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद आहे.’ असे मानणाऱ्या गुरुजींच्या या अभिनव उपक्रमाची चर्चा जिल्ह्यातून होत आहे. माने गुरुजींच्या या समाजपयोगी कार्याला सलाम ! या स्त्युत्य उपक्रमाचे साक्षीदार असलेले पालवीचे अध्यक्ष सौ.मंगल शहा, सौ पाटील, डिम्पल घाडगे, हरिदास कोळी, इंदुमती कोळी, रमेश शेंबडे, आशा शेंबडे, अंकुश नामदे , केशव राठोड, रत्ना राठोड, दयानंद देवळे, दत्तात्रय शिखरे, आर्यन माने, अधिकारी वर्ग, माने कुटुंबीय, आंबेचे सरपंच अर्जुन कोळी, माजी उपसरपंच विठ्ठल शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अन्सर शेख, अभियंता भिसे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी माने गुरुजींचे अभिनंदन केले. 








महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com