भाजपा शहराध्यक्षाची मंदिर कर्मचा-यास शिवीगाळ...पंढरपुरात जातीवाचक गुन्हा दाखल

पंढरपूर LIVE 12 नोव्हेंबर 2018


पंढरपूर : सोबत आणलेल्या लोकांना श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शनाला न सोडल्याने नाराज होऊन भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समिती कर्मचा-याास जातीवाचक शब्दप्रयोग करून शिवीगाळ केली़ यामुळे मंदिर समितीच्या कर्मचा-याने भाजपा शहराध्यक्ष यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.



दिवाळीच्या कालावधीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या सूचना कर्मचा-यांना दिल्या होत्या. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरी व भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर हे १५ ते २० लोकांना व्हीआयपी दर्शनासाठी घेऊन आले. या वेळी कर्मचारी अधिका-यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचे सांगितले. तेव्हा भाजपाचे शहराध्यक्षांनी कार्यकारी अधिका-यांना शिवीगाळ करत तुम्ही ठराविक जातीच्या लोकांना श्री विठ्ठल रुक्मिणीजवळ फोटो काढण्याची परवानगी देता, परंतु भाजपच्या लोकांना दर्शनासाठी सोडत नाही, असे म्हणून दमदाटी केली, अशी फिर्याद मंदिर समितीचे कर्मचारी विनोद अशोक वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केले आहे.

संजय वाईकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १८६० ५०४, ५०६ व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३ (१) (आर) (एस), नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ नुसार कलम ७ (१) (डी) गुन्हा दाखल केला आहे.














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com