ऊसाला प्लस 200 रुपये एफआरपी द्यावा या मागणीसाठी 'जनहित'चे उपोषण

पंढरपूर LIVE 12 नोव्हेंबर 2018


पंढरपूर तालुक्यातील साखर कारखानदारांनी ऊसाचा हप्ता एफआरपी प्लस 200 रुपये द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले आहे.


ऊस हंगाम सुरु होऊन 15 दिवस उलटून गेले तरीही अद्याप पंढरपूर तालुक्यातील एकाही साखर कारखानदाराने ऊसाचा दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शुगर अ‍ॅक्ट कायद्यामधील तरतुदीनुसार शेतकर्‍याचा ऊस गाळप झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत ऊस उत्पादकाची रक्कम शेतकरी खात्यामध्ये जमा व्हायला हवी. परंतु या कायद्याची अंमलबजावणी तर केलीच जात नाही याउलट कायदा पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकर्‍यांची संपुर्ण कर्जमाफी व्हावी, पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरचे सर्व बंधारे पुर्ण क्षमतेने भरुन घ्यावीत व वीजबिल माफ करावे या मागण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने हे उपषण सुरु आहे.



वरील मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा व शेतकर्‍यांना न्याय मिळावा अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून होत आहे.

या उपोषणामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे यु.ता.अध्यक्ष सचिन अटकळे, ता.उपाध्यक्ष रमेश लंगोटे, ता.संघटक माऊली भोसले, ऊस उत्पादक प्रतिनिधी रघुनाथ नागटिळक, श्रीकांत नलवडे, सचिन कारंडे, संतोष चव्हाण, रामभाऊ बेलदार आदींंचा सहभाग आहे. त्यांच्या या उपोषणाला बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जवळेकर, शाहजान शेख, तानाजी सोनवले, सुरेश नवले आदींनी पाठींबा दर्शविला आहे.



















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com