पंढरपूर तालुक्यातील विटे येथील पोलिस पाटलाला तलाठ्यांकडून दमदाटी.... वाळुमाफियांना साथ देण्याचा तलाठ्याकडून पोलिस पाटलांवर दबाव... प्रांताधिकार्‍यांकडे पोलिस पाटलांची तक्रार

पंढरपूर LIVE 31 ऑक्टोबर 2018


प्रतिनिधी: प्रदिप पंडीत घोडके या विटे येथील पोलिस पाटलांना तलाठी डोरले यांनीे अर्वाच्च भाषेत दमदाटी करत माझ्यासोबत वाळुमाफियांना सहकार्य कर! नाहीतर तुला बघून घेईन असा दम दिला असल्याबाबतची व तलाठी हे वाळु तस्करांकडून पैसे घेत असल्याबाबतची तक्रार पोलिस पाटलांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.

 विटे गाव हे भिमा नदीच्या काठावर आहे. या गावात सर्रास विनापरवाना अवैधरित्या वाळु उपसा होत आहे. युाबाबतचा जाब पोलिस पाटील प्रदिप घोडके यांनी तलाठी डोरले यांना विचारला; परंतु तलाठी डोरले यांनी ‘‘मी वाळू माफियाना सहकार्य करत आहे.... तुम्हीही करा! असा दबाव टाकुन दमदाटी करन्याचा प्रयत्न केला.  व मि तुला बघून घेतो असा दम दिला. यानंतर पोलिस पाटील हे काही कामानिमित्त पंढरपूरला आले असताना तलाठी डोरले यांनी त्यांच्या परस्पर त्यांच्या घरी जाऊन घरच्यांना अर्वाच्च भाषा वापरत, ‘‘पोलिस पाटील झाला म्हणजे काय शाना झाला काय? अशी भाषा  वापरली. असल्याचे पोलिस पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचसोबत ‘‘मीसुद्धा एक प्रशासकीय सेवक (पोलिस पाटील) असुन माझ्यावर वारंवार दबाव टाकला जात आहे. असेही तक्रारीत नमुद करुन पोलिस पाटलांनी प्रांताधिकारी श्री.ढोलेसाो यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी केली आहे.












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com