मातेच्या नात्याला काळीमा... आईनेच पोटच्या दोन चिमुकलींना हौदात बुडवून केले ठार...

पंढरपूर LIVE 30 ऑक्टोबर 2018

बीड- जन्मदात्या आईनेच २ मुलींना घरातील हौदात बुडवून मारुन टाकल्याची घटना शहरातील नरसोबा नगर भागात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घरातील वाद व पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने आलेल्या तणावातून या महिलेने हे कृत्य असल्याचे म्हटले जात आहे. दीपाली शाधेश्याम आमटे (वय २३) असे या निर्दयी आईचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.


राधेश्याम व दीपाली यांना तीन मुली आहेत. त्यापैकी गायत्री (वय ३) आणि छोट्या ४ महिन्याच्या मुलीला दीपालीने ठार केले. मोठी मुलगी गौरी ही ५ वर्षाची आहे. गौरी दोन दिवसापूर्वीच आत्याकडे गेल्यामुळे ती या घटनेत वाचली.

दीपाली आमटे आणि राधेश्याम आमटे हे नरसोबानगर भागात राहतात. सोमवारी घरातील सर्व लोक बाहेर गेले होते. तर राधेश्याम रिक्षा घेवून बाहेर गेला होता. राधेश्याम रात्री घरी आल्यावर त्याला पत्नी व मुली दिसल्या नाहीत. त्याने सर्वत्र पत्नी व मुलींचा शोध घेतला. मात्र, त्या कुठेच सापडल्या नाहीत. त्यामुळे राधेश्यामने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि घरी आला. मंगळवारी आंघोळीसाठी हौदातून पाणी काढत असताना राधेश्यामला मुलींचे मृतदेह दिसले. त्याने याबाबतची माहिती तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.








सोमवारी दुपारी घरी कोणीच नसल्याने दीपालीने आपल्या दोन्ही मुलींना घरातील पाण्याच्या मोठ्या हौदात टाकून दिले. त्यानंतर ती गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथे माहेरी निघून गेली. पतीने मला मारहाण करुन मुलींना हौदात टाकले, असा बनाव तिने माहेरी केला, असे पोलिसांनी सांगितले. पती चारित्र्यावर संशय घेत सतत भांडण करतो, म्हणून रागातून दीपालीने हा प्रकार केला. तिन्ही मुली असल्यामुळे दीपालीने दोन मुलींना मारले असेल का? याचादेखील तपास पोलीस करत आहेत. राधेश्याम आमटे याच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com