मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासह ७ जणांवर आरोप निश्चित

पंढरपूर LIVE 30 ऑक्टोबर 2018


मुंबई - 'एनआयए'च्या विशेष न्यायालयाने २००८ मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंहसह सात जणांवर आरोप निश्चित केले आहेत. आयपीसी आणि युएपीए कायद्यातील कलमांनुसार दहशतवादी कृत्याचा तसेच खुनाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. येत्या २ नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.


२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते.

यापूर्वी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि इतरांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाद्वारे निश्चित केलेल्या आरोपांवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता.
  • मी निरपराध- साध्वी
एनआयएने यापूर्वीच मला क्लीन चिट दिली आहे. आज माझ्यावर निश्चित करण्यात आलेले दोषारोप हा कॉग्रेसने रचलेला कट आहे. मात्र, मी निरपराध असल्याचा मला पूर्णपणे विश्वास हवा. सत्याचा नेहमी विजयच होतो. 










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com