मणिपूरमध्ये स्वेरीतर्फे तीन दिवसीय कार्यशाळा...युज ऑफ फोल्ड्स्कोप यावर स्वेरीचे प्राध्यापक करणार मार्गदर्शन

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018


पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्यूटर  सायन्स अँण्ड इंजिनिअरींग विभागातर्फे मणिपूरमध्ये राष्ट्रीय दर्जाचे ‘युज ऑफ फोल्ड्स्कोप’ या विषयावर तीनदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
           स्वेरी मार्फत आयोजिलेल्या ‘युज ऑफ फोल्ड्स्कोप’ या विषयावरील तीन दिवशीय कार्यशाळा ही मणिपूर राज्यातील संजनठोंग (इम्फाळ-पूर्व) भागातील चुराचंद उच्चमाद्यमिक प्रशालेमध्ये होणार आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व विभागप्रमुख प्रा. व्ही.डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जयंत बोकेफोडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रा रुपाली गायकवाड यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा दि. २७ ऑक्टोंबर पासून ते २९ ऑक्टोंबर दरम्यान संपन्न होणार आहे. या कार्यशाळेसाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी, गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या कडून निधी मिळाला आहे. या कार्यशाळेमध्ये तेथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना ‘फोल्ड्स्कोप’ हे नेमके काय आहे व त्याचा उपयोग शिक्षण घेताना कसा करावा हे शिकविले जाणार आहे. यासाठी प्रा. बोकेफोडे व प्रा. गायकवाड हे शुक्रवारी मणिपूरकडे रवाना होतील. स्वेरीच्या प्राध्यापकांना तेथील  डॉ. युमनाम सुरेंद्र सिंग यांच्या पथकाचे सहकार्य लाभणार आहे.  विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता नवनवीन संशोधनाद्वारे देखील विद्यार्थ्यांनी आपले संशोधन करावे या उदात्त हेतूने स्वेरी कॅम्पसमध्ये सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी संशोधनाचे वातावरण निर्माण केले आहे.त्यामुळे  स्वेरीच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत असताना संशोधनाच्या माध्यमातून विविध विषयावर, प्रकल्पांवर शोध सुरु आहेत. यातच भर म्हणून आता स्वेरीचे प्राध्यापकवर्ग राज्यात मार्गदर्शन करत असताना दुसऱ्या राज्यातदेखील मार्गदर्शन करण्याचे कार्य अवलंबले आहे असे दिसून येते. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये ‘फोल्ड्स्कोप’ प्रकल्पाकरिता डॉ. सुलभा आपटे,विभागप्रमुख प्रा. जाधव,प्रा. बोकेफोडे, प्रा. पी.जी. गायकवाड यांना आठ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रा. बोकेफोडे व प्रा. गायकवाड यांना संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com