बँक लोन मिळवून देण्याचे आमीष दाखवून लक्ष्मी टाकळीतील महिलेने अनेक महिलांची आर्थिक फसवणुक केल्याची पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार... नरेंद्र मोदी विचार मंचच्या लघु उद्योग विकास जिल्हाध्यक्षा आरती बसवंती यांच्या पुढाकाराने फसवणुक झालेल्या महिलांची न्यायासाठी धाव!

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018


Watch Vedio Report


बँक लोन मिळवून देण्याचे आमीष दाखवून लक्ष्मी टाकळीतील महिलेने अनेक महिलांची आर्थिक फसवणुक केल्याची पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार... नरेंद्र मोदी विचार मंचच्या लघु उद्योग विकास जिल्हाध्यक्षा आरती बसवंती यांच्या पुढाकाराने फसवणुक झालेल्या महिलांची न्यायासाठी धाव!

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील मौजे लक्ष्मी टाकळी येथील प्रतीभा भोजे ह्या महिलेने अनाथ, गरीब, विधवा महिलांना बँक लोन मंजुर करण्याचे आमीष दाखवून महिलांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार नरेंद्र मोदी विचार मंचच्या सोलापूर जिल्हा लघु उद्योग विकास अध्यक्षा सौ.आरती बसवंती यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यासंदर्भाची तक्रार सौ.बसवंती व फसवणुक झालेल्या महिलांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडे दिली आहे.
   



 गरजु महिलांना बँक लोण मंजुर करुन देण्यासाठी सदर महिलांकडून ‘प्रोसेसिंग फी’ गोळा केली. परंतु अद्यापही या महिलांना कसल्याही प्रकारचे बँकेचे लोन मिळालेले नाही. यावरुनच सदर महिलांची आर्थिक फसवणुक झाल्याचे निदर्शनास येत असून अशाप्रकारे महिलांची आर्थिक फसवणूक करणार्‍या संबंधित महिलेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार  दिली असल्याची माहिती नरेंद्र मोदी विचार मंच च्या सोलापूर जिल्हा लघु उद्योग विकास अध्यक्षा सौ.आरती बसवंती यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

 नरेंद्र मोदी विचार मंचचे  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरूवे वासुदेव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महीलांना न्याय देण्याचे कार्य करत आपण करत आहोत. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील महिलांची अशी आर्थिक फसवणुक झाल्याबाबतची माहिती मिळताच आपण पुढाकार घेऊन या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पंढरपूर तालुक्यातील अथवा शहरातील आणखीही कांही महिलांची अशाप्रकारे आर्थिक फसवणुक झाली असेल तर त्यांनी याबाबतची माहिती आम्हाला शिवयोगी मंगल कार्यालय, लिंक रोड पंढरपूर येथे द्यावी अथवा पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून आपली तक्रार निर्भयपणे नोंदवावी. तरच अशाप्रकारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येवून अशी फसवणुक करण्याचे प्रकार थांबवता येतील. अशी माहितीही सौ.बसवंती यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

या वेळी तक्रारदार महिला अनिता हिलाल, मंचच्या तालुकाध्यक्षा उल्का लचके, उपाध्यक्षा वैशाली धोत्रे, बायडाबाई पाटोळे, मंदोदरी मुळे, मंगल पाटोळे आदी महिला उपस्थित होत्या.








महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com