टेंभुर्णीत एका वासनांध हैवानाने केला 10 वर्षीय बालीकेवर अत्याचार... लैंगीक अत्याचार करणार्‍या लिंगपिसाट नराधमांना तत्पर आणि कठोर शासन होणे अत्यावश्यक!

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018


टेंभुर्णी (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील दोन ठिकाणी विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना ताज्या असतानाच टेंभुर्णी, जि.सोलापूर येथेही एका 10 वर्षीय बालिकेवर 18 वर्षीय वासनांध हैवानाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लहान मुलींवर अत्याचार करणार्‍या अशा लिंगपिसाट नराधमांना तत्पर आणि कठोर शासन होणे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून उमटत आहे.



टेंभुर्णी येथील घटनेसंदर्भात पोलिसांकडून मिलालेल्या माहितीनुसार  येथील अकलूज चौकात असणार्‍या घरकूल वसाहती मध्ये एका 10 वर्षाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना बुधवार दि. 24 रोजी येथील प्राथमिक आरोग्य आधिकारी मनीष पांडे यांच्या सतर्कतेमुळे उघडकिस आली असून सागर दिपक जगताप या अठरा वर्षाचा तरूणास पोलीसांनी ताब्यात घेतले असुन आरोपीवर भा.द.वि.स.कलम  376(A),376(इ),506,बालकांचे लैगीक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5(ख),6 प्रमाणे टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि. 21 रोजी घडली होती. 







यातील अल्पवयीन 10 वर्षाची पिडीत मुलगी दि. 21 रोजी सायंकाळी आठ वाजता घरकूल वसाहतीत खेळत असताना संशयीत आरोपी सागर जगताप याने सदर मुलीस एका घराचा पाठीमागे  ओढत नेले व तिच्यावर  बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास  तुला मारून टाकेन ’ अशी धमकी देवुन  निघून गेला. त्यानंतर पीडीत  मुलीचे डोके व पोट दुखू लागल्याने सोमवार दि. 22 रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टर मनीष पांडे यांनी उपचार करून घरी पाठवले. पुन्हा दोन दिवस घरात झोपून राहिल्याने बुधवारी 24 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर येथील डॉ. मनीष पांडे यांना संशय आल्याने उपचारादरम्यान पिडीत मुलीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता. तिने आपल्यावर रविवारी सायंकाळी आठ वाजता सागर जगताप याने जबरदस्ती बलात्कार केल्याचे सांगितले. तात्काळ डॉ. पांडे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गेल्या चार दिवसांपासून लपून बसलेल्या आरोपीच्या मुस्न्या आवळून त्याला ताब्यात घेतले व त्याच्याविरुध्द वरील कलमान्वये गुन्हा दाखल केला.   पुढील तपास एपीआय मगदुम हे करीत आहेत.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com