विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर ‘नाना’च चर्चेत..!

पंढरपूर LIVE 13 ऑक्टोबर 2018


निवडणुक म्हटलं की चर्चा आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा म्हटलं की आ.भारतनाना यांचं नांव त्या हमखास चर्चेत येणारच..!

अजुन विधानसभेची निवडणुक काहीशी लांबच आहे परंतु आ.भारतनाना भालके हे अमुक पक्षाात जाणार, तमुक पक्षाकडून लढणार अशा तर्क-वितर्कांना उधाण आलंय. थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि ‘नाना’ मात्र चांगलेच चर्चेत आलेले आढळून येताहेत. बाकी सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट लवकरच..... तोपर्यंत सध्याची झालेली चर्चा आणि नानांनी या चर्चेला तुर्तास दिलेला पुर्णविराम.... याची खालील बातमी वाचा. 
मी काँग्रेसचाच, पक्ष बदलाच्या चर्चेला आ.भारत भालकेंनी दिला पूर्णविराम
पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात भाजप सरकारने दुष्काळी शेतकऱ्यांना सवतीची न देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस पक्षांनी पोटच्या मुलासारखे संभाळले दुष्काळीत परिस्थिती मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत आ.भालके नी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला. ते श्रीराम मंगल कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आ.भालके म्हणाले ,की पंढरपूरातील काॅग्रेस मेळाव्यातही आपण बोलल्याचा विपर्यास करण्यात आला.माझ्या घरातील कोणी आमदार खासदार नाहीत जनता हिच माझे ठरवणार आहे सत्ताधारी मंगळवेढा सोडून अन्य तालुक्याला निधी दिला मग मंगळवेढ्यावरच अन्याय का असा सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे मला संभाळतात तर काॅग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत दोन माजी मुख्यमंत्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यावर पक्ष बदलण्याचे का आठवेल असे म्हणत उलट पुढील महिन्यातही मला दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मला मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ लैला मजनू सारखा कुणी काढू नये असेही ते बोलताना म्हणाले.








  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com