श्रीविठ्ठल-रुक्मिणी व्हीआयपी दर्शन पास विक्री प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव यांच्या निलंबनाचे आदेश... काय करणार सचिन अधटराव..?

पंढरपूर LIVE 15 ऑक्टोबर 2018


पंढरपूर - महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व जगाचा तारणहार म्हणून ओळख असलेल्या भुवैकुंठ पंढरीतील पांडुरंगाच्या व रखूमाई मातेच्या व्हीआयपी दर्शन पास विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोप असलेले शिवसेनेच्या कोट्यातील मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव यांना निलंबीत करण्याचे आदेश राज्याच्या विधि व न्याय विभागाने दिले असल्याची माहिती मिळतेय.

हैदराबाद येथील भाविकांना दर्शन पास विकण्याचा प्रकार मंदिराच्या व्हीआयपी गेटवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आला होता. या प्रकरणी 31ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दर्शन पास विक्री करणारे दोन एजंटही पोलिसांनी गजाआड केले होते. तपासात मंदिर समितीचा सदस्य सचिन आधटराव याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सचिन आधटरावला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे शासन नियुक्त मंदीर समितीची राज्यभर बदनामी झाली होती.

7 सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची बैठक होऊन आधटरावचे समिती सदस्य पद रद्द करावे असा एकमताने ठराव संमत करून शासनाच्या विधि व न्याय विभागाला तात्काळ पाठविण्यात आला होता. परंतू जवळपास दोन महिन्यांपासून राज्याच्या विधि व न्याय विभागाने काहीच कारवाई केली नसल्याने वारकरी भाविकांत संताप व्यक्त होत होता. याची दखल घेत विधि व न्याय विभागाने अधटरावला निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले असल्याची माहिती मिळतेय.

काय करणार सचिन अधटराव..?ज्यावेळेस सचिन अधटराव या सदस्यांवर आरोप झाले व याच गुन्ह्यात त्यांना आरोपी म्हणून अटकही झाली होती. यानंतर सचिन अधटराव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करत ‘मी निर्दोष आहे, परंतु माझ्यावर खोटे-नाटे आरोप झालेत आणि मंदिर समितीच्या अध्यक्षांनी मला निलंबीत घेतलेला ठराव अन्यायकारक आहे. जर मला निलंबीत केलं तर याविरुध्द मी आवाज उठवेन..! अशी भुमिका घेणार्‍या मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव आता याबाबत कोणती भुमिका घेतात याकडे सर्व भाविक भक्तांसह तमाम पंढरपूरकरांचे लक्ष लागुन राहिले आहे.








  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com