पंढरीत दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे (टु प्लस) दाखल असलेल्या आरोपींचा मेळावा...मेळाव्यासाठी 305 आरोपींची उपस्थिती

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018









पोलिस ठाणे पंढरपूर शहर, तालुका व ग्रामीण हद्दीतील शरीराविषयी, मालाविषयी, वाळू विषयी, जुगार विषयी व दारू विषयी दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे ज्या आरोपीवर दाखल आहेत अशा आरोपींचा पोलीस संकुल पंढरपूर मध्ये आज रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे पंढरपूर यांचे उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी एकूण 305 आरोपी उपस्थित होते. 

सुरुवातीला भारतीय राज्यघटना, नागरिकांचे हक्क, त्या मधील शांततेत जिवन जगण्याचा अधिकार, गुन्हा आणी कायदेशीर कारवाई समजुन सांगितली. 

गुन्हेगारी कृत्ये सोडून समाजाच्या प्रवाहात यावे म्हणून प्रबोधन व समुपदेशन करण्यात आले व यापुढे एक जरी गुन्हा दाखल झाला तरी त्यांच्यावर केली जाणारी कठोर कारवाई त्यांना सांगण्यात आली. 

मेळाव्यामध्ये सर्व आरोपींचे समोरून, डाव्या व उजव्या बाजूने फोटो काढण्यात आले तसेच त्यांचे टु प्लस फॉर्म,  सह सर्व माहिती भरून घेण्यात आली. या मेळाव्यास हजर नसलेल्या सर्व आरोपींची माहिती एक-दोन दिवसामध्ये भरून घेण्यात येत आहे.

सदर वेळी तिन्ही पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ईत्तर सर्व अधिकारी व बीट-दूरक्षेत्राचे सर्व कर्मचारी हजर होते. 

मेळाव्याची वैशिष्ठे:-1. जिल्ह्यातील संख्येने सर्वात मोठा मेळावा . . .2. गुन्हेगार मेळाव्याचा सकारात्मक प्रभाव/परिणाम दिसुन आला.3. या पुढे गुन्हे करणार नसल्याची मनिषा अनेक गुन्हेगारांनी बोलुन दाखवली.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com