सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत स्वेरी महाविद्यालय द्वितीय

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018


पंढरपूर- सोलापूर विद्यापीठ, सोलापूरतर्फे घेण्यात आलेल्या महाविद्यालयस्तरीय क्रिकेट स्पर्धेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ लढत देवून उपविजेता ठरले. अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, तंत्रशिक्षणातील वार्षिक परीक्षेचा निकाल व कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यात तर अग्रेसर आहेच परंतु यंदा क्रिकेटमध्ये देखील अग्रेसर राहण्याची संधी मात्र हुकली. असे असले तरी स्वेरीच्या खेळाडूंचा खेळ आणि त्यांच्या खिलाडीवृत्तीने मात्र प्रेक्षकांची मने जिंकली तर दुसरीकडे स्वेरीसारख्या सर्वोत्तम  संघाला पराभूत केल्याचा आनंद संगमेश्वरच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून जाणवत होता.
         क्रिकेटच्या झालेल्या एकूण सामन्यात पंकज शिंदे यांनी १३७ धावा, ऋषिकेश शिंदे यांनी ९६ धावा, ओंकार कारटकर ९१ धावा व ११ विकेट्स, पवन गवळी ९० धावा व ५ विकेट्स, निष्कलंक सपकाळ यांनी ६५ धावा व ५ विकेट्स, प्रतिक सालगुडे १२ विकेट्स, शुभम कदम यांनी ८ विकेट्स, देविदास शिंदे, सुधाकर माने, पवन गायकवाड, हर्षल माने, हनुमंत घाटे, गणेश रणनवरे, अभिषेक अलगी, अक्षय घोडके व स्वप्नील पवार या विद्यार्थ्यांनी आपला लक्षवेधी खेळ दाखवून प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्य केले. पहिल्या फेरीपासून स्वेरीने व्ही.जी. शिवधारे महाविद्यालय सोलापूर, ग्रीन फिंगर अकलूज, वालचंद महाविद्यालय सोलापूर, के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर या संघांना पराभव करून पुढे अंतिम सामन्यात सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाकडून ५ विकेट पराभूत व्हावे लागले. प्रथम फलंदाजी करताना स्वेरीने १०४ धावा केल्यानंतर संगमेश्वरने ५ विकेट गमावून १०५ धावा करून स्वेरीवर विजय मिळविला. अंतिम सामन्यात स्वेरीने संगमेश्वरच्या ५ खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखविण्यात यश मिळविले. स्वेरीच्या उपविजेत्या खेळाडुंना क्रीडाशिक्षक प्रा. रजनी वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा तसेच स्वेरी व्यवस्थापनामधील पदाधिकारी, विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या इतर तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस. एन.कुलकर्णी, वसतिगृह व्यवस्थापक व कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, क्रीडा मार्गदर्शक प्रा. संदीप साळुंखे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी क्रिकेटमधील उपविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com