सांगोला शहरातील रस्त्यांची दुरावस्था... शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करा-शहीद कामटे संघटना

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018

सांगोला/प्रतिनिधी :
    सांगोला शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या रस्त्याची, स्टेशन रोडची अत्यंत दुरावस्था झाली असून जयभवानी चौक, नगरपालिका ते मिरज रेल्वे गेट पर्यंत अक्षरश: रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे शहरवासियांमधून प्रचंड संतापाची लाट आहे. गेल्या वर्षापासून या मार्गावर लहान-मोठे खड्डे पडले असून नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन शहीद अशोक कामटे संघटनेने दिले असून त्याची अद्याप नगरपालिकेने दखल घेतली नसून गुरुवारी झालेल्या एक दिवसाच्या पावसाने पूर्णपणे हे रस्ते उखडून मोठ-मोठे खड्डे पडले असून येणाऱ्या काळात नगरपालिकेने याची दुरुस्ती नाही केली तर अपघाताची मालिका वाढतच जाणार आहे. हा रस्ता रुंदीकरण करावा याकरिता शहीद अशोक कामटे संघटना जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, नगराध्यक्षा, स्थानिक आमदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील त्याची दखल घेतली जात नाही.



    महत्त्वाचे म्हणजे स्टेशन रोड येथे आ.गणपतराव देशमुख यांचे निवासस्थान याठिकाणी असून प्रशासन याबाबत का उदासिन आहे अजून किती दिवस प्रलंबीत ठेवणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वच रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे. बायपास रस्त्याची तर फारच बिकट अवस्था झाली आहे. गत पावसाळ्यात या रस्त्यावरची खडी पूर्णपणे निघून येथील भरावच वाहून गेला आहे. नगरपालिका ठराविक ठिकाणी मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करत आहे. या सर्व संबंधीचे निवेदन नगराध्यक्षा राणी माने व मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना दिलेले आहे. याची वेळीच दखल न घेतल्यास शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपालिके विरुध्द तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.








  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com