पंढरपूर नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे संयुक्त पथकाची दंडात्मक कारवाई

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018

 पंढरपूर नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,सोलापूर यांचे संयुक्त पथकाची पंढरीत प्लास्टिक, थर्माकोल अविघटनशील वस्तू बंदीबाबत दंडात्मक कारवाई.

संपूर्ण देशामध्ये प्लास्टिक बंदी करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाने अधिसुचनेव्दारे प्लास्टिक उत्पादन व वापरावर बंदी घालून प्लास्टिक चा वापर करणार्‍यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची सुचना न्यायालयाच्या निर्णया नुसार केली होती. 


त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेने मागच्या एक महिन्या पुर्वी प्लास्टिक वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करुन ४ टन प्लास्टिक जप्त केले होते. तथापी पंढरपूर शहरामध्ये पुन्हा काही व्यापारी प्लास्टिकच्या, नॉनओवन पिशव्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्याने आज पंढरपूर नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,सोलापूर यांच्या संयुक्त पथकाने पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग व श्री विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांकडून २ टन प्लास्टिक पिशव्या व नॉन ओवन पिशव्या जप्त केल्या असुन महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तुंची विक्री, उत्पादन, साठवनुक,वाहतुक २०१८ अधिसूचना अंतर्गत तीन व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५००० रूपये प्रमाणे दंड करणेत आला. 
ही कार्यवाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्रिय अधिकारी संदीप मोटेगावकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर व आरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी विनायक शेटे, आरोग्य निरिक्षक नागनाथ तोडकर, शरद वाघमारे व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी केली.








  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com