डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी डॉल्बी साऊंड व्यवसायिकानी पुढाकार घ्यावा उप विभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांचे आवाहन

Pandharpur Live 15 September 2018

पंढरपूर शहरातील व तालुक्यातील डॉल्बी साऊं सिस्टिम व्यवसायिकांनीडॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांनी केले.
             पंढरपूर शहरातील व तालुक्यातील डॉल्बी साऊंड सिस्टिम व्यवसायिकांची आणि डिजिटल फ्लेक्स बोर्ड व्यवसायिकांची बैठक पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे घेण्यात आली. बैठकीस पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्यासह डॉल्बी चालक, डिजिटल फ्लेक्स बोर्ड व्यवसायिक उपस्थित होते.

डॉल्बी व्यावसायिकांना ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986मधील तरतुदीची माहिती श्री. कवडे यांनी दिली. गणेश उत्सव काळात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम144 लागू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
               डिजिटल फ्लेक्स बोर्ड व्यवसायिकाना  मालमत्ता विद्रुपिकरण कायदा याबाबत माहिती देण्यात आली. डिजिटल फ्लेक्स छापताना फ्लेक्स वरून कोणताही जातीय धार्मिक राजकीय तणाव निर्माण होईल असे फ्लेक्स छापू नयेफलक छापण्यापूर्वी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांची पूर्वपरवानगी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
            गणेश उत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी डॉल्बी साउंड व्यवसायिकांनी गणेशोत्सव मंडळांना डॉल्बी साऊंड सिस्टिम भाड्याने देणार नसल्याचे बैठकीत सांगितले.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com