हे गणराया! पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची सद्बुध्दी भाजपा सरकारला दे..!!

Pandharpur Live 15 September 2018


विघ्नहर्त्याच्या साक्षीनं बालाजी युवक मंडळाकडून 
भाजपा सरकारचा निषेध

पंढरपूर (प्रतिनिधी):- जिवघेण्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध.. गॅस इंधन महागाईचा निषेध... पेट्रोल, डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध... शैक्षणिक फी वाढीचा जाहीर निषेध! अशा प्रकारचे फलक हाती घेऊन आज काशीकापडी गल्ली, जुनी पेठ, पंढरपूर येथील बालाजी युवक मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विघ्नहर्त्याच्या साक्षीनं भाजपा सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. ‘‘हे विघ्नहर्त्या पेट्रोल-डिझेल चे गगनाला भिडलेले दर कमी करण्याची सद्बुध्दी भाजपा सरकारला दे! असं साकडंही यावेळी सर्व पदाधिकार्‍यांनी मंडळाच्या गणरायाला घातलं.

इंधनाचे कधी नव्हे एवढे दर वाढलेले आहेत, शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक फी मध्येही भरमसाठ वाढ झालेली आहे भाजपा सरकारच्या कारकिर्दीत वाढलेल्या या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. ‘भरल्या पोटाचे तुपाशी अन् गरीब मात्र कायमच उपाशी’ रहात आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे गणरायाच्या साक्षीनं या सरकारचा व वाढलेल्या महागाईचा निषेध व्यक्त केला व भाजापा सरकारला सद्बुध्दी देण्याची प्रार्थना गणरायाकडे केली. अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागेश गंगेकर व अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

यावेळी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते विजय टमटम, संजय उपळकर, सुभाष बिडवई, मामा फलटणकर, सलिम शेख, उपाध्यक्ष रविंद्र टमटम, विवेक गंगेकर, शुभम उपळकर, अभिषेक ननवरे, नाना वाडेकर, साहिल भिंगारे, आोम ननवरे, अभिषेक टमटम, बालाजी टमटम, नयन वाडेकर, शिवचरण वाडेकर, रॉक कुंदुर, रहिम शेख, गोपाळ पोफळे, महेश भिंगारे स्वतंत्र शिंदे, शुभम गंगेकर, रजत गंगेकर, सागर गंगेकर,आदींसह मंडळाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 










  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com