आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली - मा. अभिजीत धनंजय पाटील

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018

पंढरपूर: दि. १३ : “आजच्या यूगामध्ये संधीची कमी नाही. बाजारपेठेची गरज ओळखल्यास
यशस्वी उद्योजक निर्माण होतात. आडचणी व आपयश व्यक्तिला जास्त कणखर
बनवते. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. नविण्याचा शोध व साहस
यांची जोड जमल्यास यश दूर नाही. उद्योजक होण्यासाठी पैशापेक्षा कल्पनेची
जास्त गरज आहे. भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मोठा
भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन.” असे प्रतिपादन डी. व्ही. पी. धाराशिव
साखर कारखाना लि. चोराखळे, ता. कळंब जि. उस्मानाबाद चेअरमन मा.
अभिजीत धनंजय पाटील यांनी केले.



पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयातील वाणिज्य मंडळ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत
होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे, स्थानिक व्यवस्थापन
समितीचे सदस्य मा. सुभाष सोनावणे, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे.
तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य निंबराज तंटक वाणिज्य मंडळाचे प्रमुख
डॉ. मधुकर पांचाळ, डॉ, बी. बी. शितोळे, प्रा. टी. व्ही. अनंतकवळस, प्रा.
सागर शिवशरण, प्रा. कु. ए. जी. नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. के. पांचाळ यांनी केले. पाहुण्यांचा
परिचय डॉ, बी. बी. शितोळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. संध्या भोसले
व कु. राजश्री पवार यांनी केले. आभार डॉ. प्रा. टी. व्ही. अनंतकवळस यांनी
मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक विद्यार्थी-
विद्यार्थींनी उपस्थित होते.





  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com