नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी केली प्रभाग क्र. 16 मधील ड्रेनेजच्या कामाची पाहणी... पंढरीत होणारी विविध विकासकामे उत्कृष्ट दर्जाची होण्याकडे नगराध्यक्षांचा कटाक्ष

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018


पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी प्रभाग क्र. 16 मध्ये सुरु असलेल्या ड्रेनेज (भुयारी गटार) च्या कामाची पाहणी केली.



प्रभाग क्र. 6 मधील प्रबोधनकार ठाकरे चौक येथील भुयारी गटारीच्या कामाला सुरुवात झालेली आहे.  यावेळी याठिकाणी जाऊन नगराध्यक्षांनी या कामाबाबात अधिक माहिती घेऊन होत असलेल्या कामाच्या दर्जाबाबत अधिक माहिती घेऊन संबंधीत काम हे योग्य दर्जाचे होत असल्याबाबत खातरजमा करुन पाहिली. पंढरपूर शहरात होणारी विविध विकासकामे हे उत्कृष्ट दर्जाचीच व्हायला हवीत याकडे नगराध्यक्षांचा कटाक्ष असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रेणुकाताई धर्मराज घोडके व समाजसेवक धर्मराज घोडके आदी उपस्थित होते.





  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com