पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अविष्कार २०१८ संपन्न

पंढरपूर LIVE 5 सप्टेंबर  2018



"अविष्कार २०१८" मध्ये ३० हून अधिक प्रकल्प सादर
  पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना वापरूनज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या प्रकल्पामधुन सोलापुर विद्यापीठात होणा-या "अविष्कारया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने "अविष्कार २०१८" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
    या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी परीक्षक प्रा. राहूल पांचाळडॉ. स्वानंद कुलकर्णीप्रा. श्रीगणेश कदमप्रा. बाळासाहेब गंधारेप्रा. अविनाश हराळेप्रा. नामदेव सावंत व प्रा. अजिंक्य गायकवाड आदी जण उपस्थित होते.
     अविष्कार २०१८ चे परीक्षक प्रा. राहूल पांचाळ यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या दरम्यान डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. अविष्कार २०१८मध्ये महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे प्रकल्प सादर केले होते. सादर केलेल्या प्रकल्पाची मान्यवरांकडून पाहणी करून नंबर काढण्यात आले. सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पामधुन निवडलेले प्रकल्प हे सोलापुर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणा-या अविष्कार स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. स्वानंद कुलकर्णी,प्रा. श्रीगणेश कदमप्रा. बाळासाहेब गंधारेप्रा. अविनाश हराळेप्रा. नामदेव सावंत व प्रा. अजिंक्य गायकवाड आदी जण  या क्रार्यक्रमाचे सुञसंचालन मोबीन पिरजादे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com