श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 5 सप्टेंबर  2018



गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती असलेल्या अ‍ॅम्पिथिएटरमध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस ह्या होत्या. भारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वेरीच्या उभारणीची संघर्षपुर्ण वाटचाल कथित करुन शिक्षकदिना’चे महत्व पटवून दिले. 
यावेळी  महाविद्यालयाच्या आवारात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपन देखील करण्यात आले. संपूर्ण दिवसभर महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी हे शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत होते. यावेळी डॉ. प्रशम कोल्हे, गोपाळपूरच्या सरपंच सौ विजया जगताप, उपसरपंच उज्वला बनसोडे, ग्रामसेविका ज्योती पाटील, सो.वि.सोचे राज्यपाल नियुक्त सदस्य महेश माने, अ‍ॅड.कळके, सो.वि.सो व्यवस्थापन परिषदेचे अश्विनी चव्हाण, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, विश्वस्त बी.डी.रोंगे, सुरज रोंगे, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे सुमारे 4 हजार विद्यार्थी, पालक उपस्थित होते. आगमन करतेवेळीचे नियोजन व सत्कारावेळीचे सुरेल बासरीवादन यामुळे परिसरात उत्साह वाढत होता. सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी. ऐश्वर्या मासाळ, चैतन्य कापशीकर, टी.सी.एस. कंपनीत रुजू झालेले स्वेरीचे माजी विध्यार्थी अक्षय मोरे, प्रा. विक्रम मगर यांनी शिक्षक दिनाचे महत्व पटविणारी लक्षवेधी भाषणे दिली. बघा पंढरपूर लाईव्हचा हा व्हिडीओ 








  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com